मुंबईतील ‘अविघ्न पार्क’ इमारतीला भीषण आग; सर्वत्र धुराचे लोट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लालबागमधील ‘अविघ्न पार्क’ इमारतीमध्ये भीषण आग लागली आहे. इमारतीच्या ३५ व्या मजल्यावर ही आग लागली आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग वीजवण्याचे प्रयत्न सुरु आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी घडलेली नाही.

आज सकाळी 10 वाजून 45 मिनिटांनी ही आग लागली असल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. आग भीषण असल्याने सर्वत्र परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. इमारतीतील रहिवाश्याना सुरक्षेच्या कारणास्तव बाहेर काढलं जात आहे. मात्र अचानक लागलेल्या आगीमुळे रहिवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.

अविघ्न पार्क’ इमारतीला गेल्या वर्षीही आग लागली होती, त्यांनतर दुसऱ्यांदा अग्नितांडव पाहायला मिळाल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.