Matheran Hill Station | अवघ्या 35 रुपयांमध्ये महाराष्ट्रातील सर्वात सुंदर हिल स्टेशनला भेट द्या; येईल निसर्गाचा अद्भुत अनुभव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Matheran Hill Station | शहरांमधील धावपळीचे जीवन तसेच रोजचा काम धंदा या सगळ्याला कंटाळून माणूस फिरायला जात असतो. खास करून शहरातील लोकं हे डोंगराळ भागात जंगलामध्ये फिरायला जातात. परंतु डोंगराळ भागांमध्ये येणाऱ्या लोकांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. त्यामुळे सगळीकडेच प्रदूषण पाहायला मिळते. परंतु आज आम्ही तुम्हाला अशा एका हिल स्टेशनबद्दल सांगणार आहोत. जिथे अजिबात तुम्हाला प्रदूषण पाहायला मिळणार नाही. या ठिकाणी गेल्यावर तुम्हाला निसर्गाचा नंतर घेता येईल. तसेच घोड्यावर स्वार करता येईल. आनंद घेता येईल. तुम्ही महाराष्ट्रातील अत्यंत लहान असलेल्या हिल स्टेशनला म्हणजेच माथेरानला भेट देऊ शकता. माथेरान हे महाराष्ट्रातील एक लोकप्रिय आणि सगळ्यात लहान असे हिल स्टेशन आहे. या ठिकाणी दरवर्षी अनेक लोक भेट देत असतात.

महाराष्ट्रात लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर या ठिकाणी अनेक लोक जात असतात. तिथे सातत्याने गर्दी देखील असते. परंतु माथेरान (Matheran Hill Station) हे हिल स्टेशन या सगळ्यांपेक्षा खूप वेगळे आहे. इथे अत्यंत शांतता असते. तसेच हिरवेगार जंगल, धबधबे या सगळ्यांनी माणूस मोहित होऊन जातो. तुम्ही जर या ठिकाणी ट्रीप करायचा प्लॅन करत असाल, तर अत्यंत कमी बजेटमध्ये तुम्ही माथेरानची ही ट्रीप प्लॅन करू शकता.

आज आम्ही तुम्हाला माथेरानला जाण्यासाठी एक अत्यंत चांगला मार्ग सांगणार आहोत. माथेरानला आल्यावर तुम्हाला तुमची गाडी तीन किलोमीटर आधीच थांबावावी लागते. आणि तिथून पुढे घोड्यावरून प्रवास करावा लागतो. तुम्ही निसर्गाच्या सानिध्याचा आनंद घेत या घोड्यावरून जाऊ शकता तुम्हाला या घोडेस्वारीसाठी 2000 ते 2500 हजार रुपये द्यावे लागतात. तसेच तुम्ही या ठिकाणी ट्रेकिंग देखील करू शकता. तुम्ही या ठिकाणी आल्यावर गाडी पार्किंगला तुम्हाला 35 रुपये द्यावे लागणार आहेत.

माथेरान (Matheran Hill Station) हे महाराष्ट्राच्या पश्चिम घाटातील सह्याद्रीच्या रांगेत असलेले एक छोटेसे हिल स्टेशन आहे. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेल्या पश्चिम घाट किंवा सह्याद्री असे म्हणतात. माथेराने समुद्रसपाटीपासून 2600 फूट उंचीवर आहे. माथेरान हिल स्टेशन मुंबई पासून केवळ 100 किलोमीटर अंतरावर आहे.

या ठिकाणी तुम्ही मुंबईतील लोकल नेरळ स्टेशनवर पोहोचू शकता. तिथून नेरळ माथेरान टॉय ट्रेनने माथेरानला जाऊ शकता. नेरळ ते माथेरानला 21 किलोमीटर रेल्वे मार्गाने जोडते. जर तुम्ही स्वतःच्या गाडीतले जाणार असेल, तर माथेरानच्या तीन किलोमीटर आधीच तुम्हाला दस्तूर पॉईंटच्या पार्किंगमध्ये ही कार पार्क करावे लागते. कारण इथून पुढे वाहनांना जाण्यास पूर्णपणे मनाई आहे. तिथून पुढे माणूस ते पालखीने किंवा घोड्याने जावे लागते. येथून माथेरानला जाण्यासाठी 15 ते 20 मिनिट लागतात. तुम्ही अगदी कमी बजेटमध्ये ही ट्रीप करू शकता.

या ठिकाणी गेल्यावर तुम्हाला अनेक राहण्यासाठी पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही हॉटेल, लॉज किंवा विलामध्ये देखील लावू शकतात. अत्यंत कमी बजेटमध्ये येथील हॉटेल उपलब्ध असतात. सकाळी दहा ते अकरा पर्यंत माथेरानला पोहोचण्याचा प्रयत्न करा. हॉटेलमध्ये चेक इन करा त्यानंतर मग तुम्ही फिरायला जाऊ शकता. तुम्ही ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकता. तसेच पर्वतांच्या सौंदर्याचा देखील आनंद घेऊ शकता. माथेरान जवळपास अडीच ते तीन किलोमीटर परिसरात पसरलेले आहे. या ठिकाणी तुम्ही शार्लेट लेक, मंकी पॉईंट, इको पॉईंट, लुईसा पॉईंट यांसारख्या पर्यटन स्थळांना भेट देऊ शकता.