Matheran Tourism: माथेरानला पर्यटन करताय? जरा थांबा! आधी ही बातमी वाचा

Matheran Tourism
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Matheran Tourism – माथेरानमध्ये पर्यटकांची फसवणूक अन लुटीचे प्रकार वाढले आहेत, ज्यामुळे पर्यटन व्यवसायावर विपरीत परिणाम होत आहे. घाटाच्या पायथ्याशी टॅक्सी संघटनांकडून अतिरिक्त टोल घेतला जातो, आणि नकार दिल्यास पर्यटकांना खाली उतरवले जाते. यामुळे माथेरानच्या पर्यटनावर नकारात्मक प्रभाव पडत आहे. या बेकायदेशीर वसूलीला तातडीने थांबविण्याची मागणी स्थानिक पर्यटन बचाव संघर्ष समितीने केली आहे. माथेरानमध्ये पर्यटकांची लूट रोखण्यासाठी माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीने बेमुदत संप पाळण्याची घोषणा केली आहे.

पर्यटकांच्या लुटीला रोखण्यासाठी बेमुदत बंद (Matheran Tourism)

माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीने प्रशासनावर गंभीर आरोप करत सांगितले की, पर्यटकांच्या लुटीला थांबवण्यास प्रशासन कानाडोळा करत आहे. यामुळेच समितीने बेमुदत बंद पुकारला असून हॉटेल उद्योग, ई-रिक्षा संघटना, व्यापारी आणि सामाजिक संस्थांनी या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माथेरानच्या मुख्य प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी नाक्यावर काही दलालांनी पर्यटकांना फसवून जास्त पैसे उकळले आहेत. यामध्ये घोडेवाल्यांचा देखील समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे.

समितीने काय मागणी केली –

समितीने मागणी केली आहे की, दस्तुरी फाट्यावर पोलीस बंदोबस्त वाढवावा, पर्यटन सुविधा केंद्र सुरू करावे, पार्कींग झोनमध्ये घोडेवाले, एजंट कुली यांना प्रवेश बंदी घालावी, सिसीटीव्ही कॅमेरे लवकर सुरू करावेत. माथेरानच्या घाटाच्या पायथ्याशी बेकायदेशीर वसूली थांबवावी. घोडे चालक, कुली, रिक्षाचालकांचे दरपत्रक दर्शनी भागात लावावेत आणि बेकायदेशीर पथविक्रेत्यांवर कारवाई करावी. यामुळे पर्यटकांना योग्य माहिती मिळेल अन त्यांची फसवणूक होणार नाही, यासाठीच माथेरानमधील (Matheran Tourism)सर्व व्यावसायिकांनी प्रशासनाविरोधात कडक बेमुदत बंद पाळण्याचा निर्धार केला आहे आणि या बंदला मोठा पाठिंबा मिळत असल्याचं समितीने सांगितलं आहे.