तब्बल एक एकर जागेवर स्थापन करणार ‘मातृ वन’; कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिली माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्यासाठी आपले पर्यावरण खूप जास्त महत्त्वाचे आहे. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आणि त्याची वाढ करण्यासाठी नेहमीच वेगवेगळ्या प्रयत्न केले जातात. सरकार देखील आपल्या पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी नेहमीच पुढचे पाऊल टाकत असतात. अशातच आता आपल्या या पर्यावरणासाठी कृषी मंत्रालय पर्यावरण रक्षणासाठी मातृवन कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत जवळपास एक एकर जमिनीवर झाडे लावण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याआधी ‘एक पेड मा के नाम’ ही मोहीम सुरू केलेली आहे. आणि याच मोहिमेच्या अंतर्गत हे मातृवन कार्यक्रम चालू करण्यात येणार आहे. मंत्रालयाने या योजनेअंतर्गत दिल्लीच्या पुसा कॅम्पसमध्ये देखील रोपे लावलेली आहेत.

याबद्दलची माहिती केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिलेली आहे. याबद्दल ते म्हणाले की, मंत्रालय सुमारे आता एक एकर जमिनीवर मातृवन तयार करणार आहेत. पर्यावरण संरक्षण करण्यासाठी आणि त्या प्रयत्नांना चालना देण्यासाठी सरकारमार्फत हा एक मोठा उपक्रम चालू करण्यात आलेला आहे. हा उपक्रम भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सुरू केलेला आहे. हा कार्यक्रम एक पेड मा के नाम या जागतिक उपक्रमाचा भाग असल्याचे देखील कृषिमंत्र्यांनी सांगितलेले आहे. या उपक्रमांतर्गत कृषी मंत्रालयाने सुमारे 800 संस्थांनी देशभरात 3 हजार ते 4 हजार रोपांची लागवड केलेली आहे.

केंद्र सरकारच्या या एक पेड मा के नाम या मोहिमेचे उद्दिष्ट हे सप्टेंबर 2024 पर्यंत आपल्या संपूर्ण देशामध्ये 80 कोटी रोपे आणि मार्च 2025 पर्यंत 140 कोटी रुपये लावण्याचे आहे. आणि ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सरकार अतोनात प्रयत्न देखील करत आहे. आपले पर्यावरण जपावे यासाठी सरकारकडून हे मोठे प्रयत्न चालू आहेत. पंतप्रधानांनी याबाबत आव्हान केल्याने त्यानंतर मंत्रालयाने वृक्षरोपणाला जन चळवळ म्हणून स्वीकारले आहे. हवामान बदलाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि पर्यावरणास अनुकुल उपायांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारचा हा एक मोठा प्रयत्न आहे. आणि त्यासाठी अनेक लोकांनी भाग देखील घेतलेला आहे.