हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सुनील शेळके (Sunil Shelke) तू आमदार कोणामुळं झाला, तुझ्या सभेला कोण आलं होतं. पक्षाचा अध्यक्ष कोण होतं? तुझ्या त्या अर्जावर माझी सही आहे, हे लक्षात ठेवा. यापुढं असं काही केलं तर मला शरद पवार म्हणतात, हे विसरू नका. मी त्या वाटेने जात नाही, पण गेलो तर मी कोणाला सोडत नाही…. मावळचे अजित पवार गटाचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांना दस्तूर खुद्द शरद पवारांनी दिलेला हा धमकीवजा इशारा… शरद पवारांचा हा रुद्रावतार पाहून सुनील आण्णा शेळकेंच्या आमदारकीवर आभाळ आलय अशी एकच चर्चा सुरू झाली… खरंतर येणाऱ्या मावळ विधानसभा मतदारसंघात खरा संघर्ष असणार आहे तो बाळा भेगडे विरुद्ध सुनील शेळके असा…. पण महायुतीच्या एकाच झोपडीत हे दोन्ही कट्टर विरोधक एकत्र आल्याने यातल्या एकाला बंड करण्याशिवाय पर्याय उरला नाहीये, हे तर क्लिअर कट आहे… मग अशा वेळेस शरद पवार इथं काही विषय खोल करणार का? सीटिंग एमएलए च्या फॉर्म्युला नुसार जर शेळकेंनाच उमेदवारी मिळणार असेल तर भेगडे साहेबांच्या गळाला लागतील का? मावळमधील विधानसभा निवडणूक येणाऱ्या टर्मला नेमकं जिंकतंय कोण? त्याचाच हा खराखुरा ग्राउंड वरचा आढावा….
मावळच्या रांगड्या मातीप्रमाणे इथलं राजकारणही रांगडं असलं तरी या मातीने नेहमीच भाजपच्या बाजूने कौल दिला… 1995 मध्ये रुपलेखा धोत्रे यांनी मावळात भाजपला संधान बांधून दिलं ते कायमचंच… यानंतर दिगंबर भेगडे आणि बाळा भेगडे प्रत्येकी दोन टर्म याच मावळातून विधानसभेवर गेले… आणि मावळच्या राजकारणात भाजी एके भाजप… भाजप दूने भाजप… इतका सारा होल्ड पक्षाने मिळवला होता… बाळा भेगडे यांना फडणवीस सरकारच्या काळात शेवटच्या वर्षी राज्यमंत्रीपदही देण्यात आलं… 2019 ला बाळा भेगडेंना आमदारकीच्या हॅट्रिकची संधी चालून आलेली असताना त्यांना मोठं राजकीय आव्हान उभे राहिलं… पण ते काही वेगळ्या पक्षातून नाही तर त्यांच्याच भाजपमधून…
कारण आमदारकीसाठी दहा ते पंधरा वर्षे वेट अँड वॉच वर असणारे पक्षातीलच इच्छुक आता बंडाच्या मूडमध्ये होते… त्यात रवींद्र भेगडे आणि सुनील शेळके यांच्या आमदार होण्याच्या सुप्त इच्छा कधी लपून राहिल्या नव्हत्या…. भाजप पक्ष वाढीसाठी शेळके अगदी प्रामाणिकपणे काम करत होते…. भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेवर विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी काम केलं…. पण आपल्याला यंदाही डावललं जातंय असं ध्यानात येताच त्यांनी राष्ट्रवादीत उडी घेत विधानसभेचं तिकीटही मिळवलं… भाजपकडून स्टँडिंग आमदार बाळा भेगडे तर राष्ट्रवादीकडून सुनील शेळके यांच्यात 2019 ला अटीतटीचा सामना झाला… आणि शेळकेंनी इतिहास रचत पहिल्यांदाच राष्ट्रवादीचा झेंडा मावळात फडकवला…
आमदार होताच शेळकेंनी वर्चस्वाच्या राजकारणाला सुरुवात केली…. ग्रामपंचायत असो वा बाजार समिती प्रत्येक निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीचा दबदबा कायम ठेवला… त्यासोबतच मतदारसंघात विकास कामांचा सपाटाही सुरूच ठेवला… त्यात गावं दत्तक घेऊन विकासाचं मॉडेल तयार करणं, महिलांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण, विद्यार्थ्यांना परीक्षेच्या काळात मोफत वाहन व्यवस्था, पोलीस कार्यालय, पीडीसी बँकेची इमारत, सरकारी दवाखाना, प्रशासकीय इमारत अशा शहरी विकासाला हात घालत शेळकेंनी मतदार संघातील आपली राजकीय ताकद चांगलीच वाढवलीय… वर्चस्वाचे राजकारण वाढवत तीपटीने वाढवलेला जनसंपर्क, सोशल मीडियावर घातलेला धुमाकूळ यातून आमदार असूनही शेळके शेळके उभ्या महाराष्ट्राला माहित झाले… त्यात अजित पवारांनी वारंवार दिलेली ताकद पाहता राष्ट्रवादीच्या फुटीत ते दादांसोबत आले…. आणि मावळात पुन्हा राजकीय गुंता झाला….
कारण अजितदादांसोबतच आलेले बापू भेगडे, भाजपचे रवींद्र भेगडे व बाळा भेगडे अशा सगळ्यांच्याच आमदारकीच्या स्वप्नांवर शेळकेंनी महायुतीत येऊनमहायुतीत येऊन पाणी फिरवलंय… अजित दादांसाठी शरद पवार गटातील दिग्गजांना शिंगावर घेणं असो किंवा मेरिटच्या बेसिसवर असो सुनील शेळके यांचं काम नेहमी उजवं ठरतं…. त्यामुळे तेच यंदाही महायुतीचे उमेदवार असतील, हे तर फिक्स आहे… जुना भाजपचा केडर आणि नव्याने बांधलेली राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांची फौज असा दोन्ही बाजूंचा फोर्स असल्याने विद्यमान आमदारांना आव्हान देणं विरोधातील उमेदवाराला थोडं जडच जाणार आहे… सध्या तरी भाजपच्या गोटातीलच नेत्यांनी ‘लक्ष विधानसभा’ असं म्हणून पक्षाची अडचण वाढवलीय… तर दुसरीकडे राष्ट्रवादीकडून दत्तात्रय पडवळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता जास्त आहे… पण बापू भेगडे दरम्यानच्या काळात राष्ट्रवादीची तुतारी हातात घेतात का? हे पाहणंही इंटरेस्टिंग करणार आहे… अर्थात येत्या काळात सुनील शेळकेंच्या राजकारणाचे पंख छाटण्यासाठी शरद पवार यांच्या गोटातूनही मोठी फिल्डिंग लागू शकते… राष्ट्रवादीत फुटीर झाल्याने मतदार संघातील शरद पवारांना मानणारा मोठा वर्ग शेळकेंवर नाराज आहे… त्यात पवना धरणग्रस्तांचे रखडलेलं पुनर्वसन, रेड झोनची टांगती तलवार आणि इतर अनेक शहरी प्रश्नांना शेळके न्याय देऊ शकले नाहीत… त्यामुळे कमळाकडून घड्याळाकडे गेलेला मावळ विधानसभा मतदारसंघ येणाऱ्या निवडणुकीत तुतारीकडे शिफ्ट होणार का? हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे…
बाकी लोकसभेच्या लीडमुळे सध्यातरी सुनील शेळके यांची आमदारकी सेफ झोनमध्ये दिसत असली तरी शरद पवार आयत्या टाइमिंगला इथून कोणते राजकीय पत्ते बाहेर काढतात? यावरही इथलं बरचस समीकरणे अवलंबून असणारय… त्यात काँग्रेसनेही मावळच्या जागेचा हट्ट धरल्याने महाविकास आघाडीला ही जागा कुणाला सोडायची? यावर बरीच काथ्याकुट करावी लागणार आहे… त्यात प्रदेश प्रतिनिधी दिलीप ढमाले, प्रदेश सरचिटणीस निखिल कविश्वर, तालुकाध्यक्ष यशवंत मोहोळ आणि उद्योजक रामदास काकडे यांनी आमदारकीसाठी दंड थोपटण्याची तयारी दाखवलीय… पण सध्या तरी मावळातली लढाई शेळके वर्सेस भेगडे याच लाईनअपने पुढे जाईल असं वाटतंय… त्यात महायुतीकडून शेळकेंचं नाव जवळपास कन्फर्म आहे… त्यामुळे प्रश्न उरतो तो फक्त भेगडेंचा… आता या तीन भेगडेंपैकी नेमका कोणता चेहरा आणि कोणत्या पक्षाकडून शेळकेंना कडवं आव्हान देण्यासाठी मैदानात उतरेल? बदललेली राजकीय समीकरणे पाहता मावळातील सर्वात जास्त इंटरेस्टिंग मतदारसंघाचा 2024 चा आमदार नेमका कोण? तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा.