हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल जवळपास सगळ्याच लोकांचे बँकांमध्ये अकाउंट असतात. बँकांमध्ये अकाउंट असले की, आपले आर्थिक व्यवहार चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येतात. आपल्याकडे असलेले पैसे आपल्याला सुरक्षित ठेवता येतातम बँकांमध्ये पैसे ठेवल्यानंतर त्याचे अनेक नियम असतात. ते नियम आपल्याला पाळावे लागतात. परंतु आपल्याला अगदीच बेसिक माहिती असते. बँकेचे असे अनेक रुल्स आहेत ज्याबद्दल आपल्याला माहियी नसते. बँकांमध्ये आपण पैसे जमा करताना काही मर्यादा दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे एटीएम कार्डचे शुल्क, चेकचे शुल्क यांसारख्या अनेक गोष्टी आहेत. याबाबत आरबीआयने सगळ्या बँकांना मार्गदर्शक तत्वे जारी करत असतात.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपण कोणत्याही बँकेत खाते चालू केले, तर त्यामध्ये कमीत कमी रक्कम आपल्याला ठेवावी लागते. परंतु अनेक लोकांना आपल्या सेविंग अकाउंटमध्ये जास्तीत जास्त किती रक्कम ठेवावी लागते? याबद्दलची माहिती नसते. अनेक बँकांमध्ये किमान पैसे ठेवण्याची मर्यादा 1000 असते तर काही बँकांमध्ये ही 10 हजार रुपये देखील असते.
तुम्ही जर तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा करत असेल तर त्यासाठी देखील काही मर्यादा आहे. आयकर नियमानुसार एखादी व्यक्ती आर्थिक वर्षांमध्ये त्याच्या बचत खात्याचे जास्तीत जास्त 10 लाख रुपये घेऊ शकता. यापेक्षा जर तुम्ही जास्त पैसे तुमच्या बँक अकाउंटमध्ये ठेवले, तर या व्यवहाराची माहिती तुम्हाला आयकर विभागाला द्यावी लागते. त्याचप्रमाणे जर तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये एका वेळेस 50 हजार रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम जमा केली, तर त्यासोबत तुम्हाला पॅन नंबर देखील द्यावा लागतो ल. तुम्ही एका दिवसात जास्तीत जास्त एक लाख रुपये रोख रक्कम जमा करू शकता. परंतु जर तुम्ही अकाउंट मध्ये नियमितपणे ही रक्कम जमा करत नसेल, तर ही मर्यादा 2.5 लाख रुपये एवढी असू शकते.
तुम्ही तुमच्या सेविंग अकाउंटमध्ये दहा लाख रुपये ठेवू शकता. दहा लाख रुपये जास्त जर रोख रक्कम असेल तर आयकर रिटर्न यांच्यामार्फत तुमची छाननी केली जाते. परंतु यामध्ये जर तुम्ही पकडले गेला, तर तुम्हाला मोठा दंड देखील होती ठोठावला जाऊ शकतो. यामध्ये तुम्हाला तुमच्या उत्पन्नाचा स्त्रोत उघड करावा लागतो. जर तो झाला नाही, तर तुमच्या रकमेवर 60% दंड तर 25% अधिभारने 4% उपकर लावले जातो.
आपण सगळेजण आपल्या आर्थिक सुरक्षिततेसाठी बचत करत असतो. परंतु जर तुम्ही बँकांच्या नियमांचे पालन केले नाही, तर तुम्ही जमावलेली सगळी रक्कम तुम्हाला कर स्वरूपात द्यावी लागेल. त्यामुळे तुम्ही तुमच्या खात्यांमध्ये किती रक्कम ठेवावी ठरवले पाहिजे.