माझी लाडकी बहीण योजनेनं महाविकास आघाडी धोक्यात आलीय??

mazi ladki bahin yojana
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन : लोकसभा निवडणुक झाल्यानंतर राज्यात महाविकास आघाडीच्या बाजूने कौल असल्याचं बोललं गेलं.. पण महायुतीनं एक मास्टर स्ट्रोक खेळत हे सगळं वारं आपल्या बाजूने फिरवून घेतलं… त्याला कारण ठरली ती एक योजना ती म्हणजे लाडकी बहीण योजना (Mazi Ladki Bahin Yojana) … जेव्हा या योजनेची घोषणा करण्यात आली तेव्हापासून ही योजना वाऱ्यासारखी दुर्गम भागात, खेडोपाडी जाऊन पोहचली… सरकारी कार्यालयात, इ सेवा केंद्रात महिलांच्या रांगा लागल्या.. गर्दी झाली.. कागदपत्रांसाठी लयलूट केल्याची बातमीही आली.. विरोधकांच्या टीकांकडे दुर्लक्ष करत सरकारनं नियम – अटी शिथील करत योजनेची अंमलबजावणी करण्याची प्रक्रीया साधी सोपी आणि सर्वसमावेशक केली… पण या योजनेचा इम्पॅक्ट येणाऱ्या राजकारणावर कसा पडेल? लाडकी बहीण योजनेला माता भगिनींचा इतका चांगला रिस्पाॅन्स कसा मिळतोय? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे येणाऱ्या विधानसभेला या योजनेमुळं शिंदे – फडणवीस – अजितदादा प्लसमध्ये राहू शकतात का? तेच पाहूयात

महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये ॲनिमियाचे प्रमाण 50 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. तसंच, राज्यातील श्रमबल पाहणीनुसार पुरुषांची रोजगाराची टक्केवारी 59.10 टक्के आणि स्त्रियांची टक्केवारी 28.70 टक्के इतकी आहे.’ महाराष्ट्राच्या विधानसभेत नुकत्याच सादर करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या शासनिर्णयाची सुरुवातच या वाक्यापासून होते. ‘पुरोगामी राज्य’ अशी ओळख असणाऱ्या महाराष्ट्रातील महिलांच्या परिस्थितीची कबुली दस्तरखुद्द सरकारनेच या आदेशात दिलेली आढळून येते. 28 जून 2024 रोजी राज्याचा अर्थसंकल्पातून या योजनेची घोषणा करताना अर्थमंत्री अजित पवार म्हणाले की, महिलांची ही परिस्थिती सुधारण्यासाठीच आम्ही ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ लागू करत आहोत. महाराष्ट्रातील शेतकरी, विद्यार्थी, तरुणवर्ग, अल्पसंख्यक समुदायासाठी वेगवेगळ्या योजनांची घोषणा अर्थसंकल्पातून करण्यात आली. मात्र, लक्षवेधी योजना ठरली ती ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना…

अर्थसंकल्प सादर केल्यानंतर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सर्व मंत्री आणि सत्ताधारी नेत्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून या योजनेचा भरभरून प्रचार करण्यात आला… या योजनेनुसार, राज्यातील महिला व मुलींना स्वावलंबी, आत्मनिर्भर करण्यासाठी, तसंच महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घोषित केल्याचं सांगितलं जातंय. 26 जानेवारी 2023 पासून मध्य प्रदेशमध्ये माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान सरकारने ‘लाडली बहना योजना’ सुरू केली होती. या योजनेअंतर्गत महिलांना प्रति महिना 1 हजार रुपये देणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि पर्यायाने शिवराज सिंग चौहान लाडली बहना योजनेचा फायदा झाल्याचं राजकीय विश्लेषकांनी म्हटलं होतं… अगदी याचप्रमाणे लाडक्या बहीण योजनेतून 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना राज्य सरकार मार्फत दरमहा दीड हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात आलंय…

थोडक्यात हा निर्णय एतिहासिक म्हणावा लागेल.. त्यातल्या त्यात योजनेची अंमलबजावणी करताना येणारी अडचण पाहता महायुती सरकारने लाडली बहीण योजनेच्या अटी शर्ती आणखीनच शिथिल केल्या आहेत. आता domicile चा दाखला नसल्यास जूने रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, जन्म दाखला अशी अनेक कागदपत्रे देता येतात. जमीन मालकीच्या अटी सुद्धा काढून टाकण्यात आलेल्या आहेत… योजनेला जास्तीत जास्त सर्वसमावेशक करण्यासाठी हे सगळे प्रयत्न करण्यात आले… या योजनेला मिळणारा पॉझिटीव्ह रिस्पाॅन्स पाहता येणाऱ्या विधानसभेला महायुतीला ही योजना प्लसमध्ये घेऊन जाणारी ठरेल, एवढं मात्र नक्की..

विरोधाच्या अनेक बाजू असल्या तरी राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणं आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्याचा व्यापक विचार डोळ्यासमोर ठेऊन शासनानं घेतलेल्या या निर्णयाचं कौतुक केलंच पाहीजे.. फक्त या योजनेचं पिल्लू सोडृन चालणार नाही.. तर ती योजना तडीस नेणं.. त्याची अंमलबजावणी पारदर्शकपणे करण्याची जबाबदारीही सरकारवर असणार आहे… मध्यप्रदेशमध्ये सेम टू सेम या योजनेमुळे भाजपला मोठा फायदा झाला.. पक्ष सत्तेत आला.. त्यामुळे या लाडक्या बहीण योजनेचा फायदा येणाऱ्या काळात महायुतीला मिळणार असल्याचं अनेक राजकीय विश्लेषकही सांगतायत.. महिलांचा सन्मान करणारं सरकार या बॉटमलाईन खाली येणाऱ्या विधानसभेला महायुती प्रचार करण्याचे जान्सेस जास्त आहेत.. त्यामुळे आता त्याला काऊंटर करण्याचं मोठं आव्हान महाविकास आघाडीसमोर असणार आहे.. बाकी ज्या उद्देशासाठी म्हणजेच महिलांचं आरोग्य आणि आर्थिक स्वातंत्र यासाठी योजना सुरु करण्यात आलीय, तो परपज पूर्ण होईल का? लाडकी बहीण योजना महायुतीला पुन्हा एकदा सत्तेच्या खुर्चीत बसवणारा एक्स फॅक्टर ठरेल का? तुम्हाला काय वाटतं? ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा…