हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या लग्नाचा हंगाम सुरू असून, नवविवाहित जोडप्यांना हनिमूनसाठी खास डेस्टिनेशन (Best destination for honeymoon) निवडायचे आहे. पण अनेक जोडपी बजेटमुळे महागड्या ठिकाणांऐवजी कमी खर्चात सुंदर आणि शांत ठिकाण शोधत असतात. अशा परिस्थितीत झारखंडमधील मॅकक्लूस्कीगंज हे ठिकाण तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो . हे ठिकाण निसर्गसौंदर्याने नटलेले असून ते कमी खर्चात रोमँटिक आणि अविस्मरणीय अनुभव देऊ शकते. तर चला या ठिकाणांबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
मिनी लंडन म्हणून ओळख –
झारखंडची राजधानी रांचीपासून अवघ्या 40 किलोमीटर अंतरावर असलेले मॅकक्लूस्कीगंज हे एक छोटेसे हिल स्टेशन आहे. येथील ब्रिटिश काळातील वाडे, घनदाट जंगल, टेकड्या आणि शांत नद्या यामुळे हे ठिकाण निसर्गप्रेमींसाठी खास आहे. हे ठिकाण झारखंडचे मिनी लंडन म्हणून ओळखले जाते. त्यामुळे येथे अनेकांची पसंती असल्याचे दिसून येते.
बजेटमध्ये हनिमून ट्रिप –
जर तुम्हाला कमी बजेटमध्ये हनिमून प्लॅन (Honeymoon Plan) करायचा असेल तर मॅकक्लूस्कीगंजला भेट देणे फायदेशीर ठरेल. येथे हॉटेलच्या रूमचे भाडे अवघ्या 1000 पासून सुरू होते. ऑनलाईन बुकिंग केल्यास त्यामध्ये सवलत मिळू शकते. खाण्यापिण्याचेही अनेक स्वस्त पर्याय येथे उपलब्ध आहेत. योग्य नियोजन केल्यास फक्त 5000 च्या बजेटमध्ये दोन ते तीन दिवसांची हनिमून ट्रिप सहज करता येते.
फिरण्यासाठी अनेक आकर्षक ठिकाणे –
मॅकक्लूस्कीगंजमध्ये फिरण्यासाठी अनेक आकर्षक ठिकाणे आहेत. तुम्ही पार्टनरसोबत शांत वेळ घालवण्यासाठी पत्राटू व्हॅलीला भेट देऊ शकता. रांचीपासून 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या या ठिकाणाला झारखंडची मनाली असेही म्हटले जाते. तसेच येथे ट्रेकिंगसाठी देखील उत्तम पर्याय उपलब्ध आहेत. टेकड्यांवरून दिसणारा सूर्यास्ताचा नजारा अविस्मरणीय अनुभव देतो.
मॅकक्लूस्कीगंजला पोहोचण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध –
मॅकक्लूस्कीगंजला (Mccluskieganj) पोहोचण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी हावडा स्टेशनवरून मॅकक्लूस्कीगंजसाठी नियमित ट्रेन सेवा उपलब्ध आहेत. जर आपल्याला फ्लाईटने प्रवास करायचा असेल, तर सर्वात जवळचे विमानतळ रांची येथे आहे, जे मॅकक्लूस्कीगंजपासून 53 किमी अंतरावर स्थित आहे. रांचीला पोहोचल्यावर, आपल्याला बस सेवा किंवा भाड्याने कार घेऊन निसर्गरम्य रस्त्यांचा आनंद घेत मॅकक्लूस्कीगंजला पोहोचता येते.