MDH Everest Controversy | MDH आणि Everest वादात सरकारची उडी; सर्व राज्यांना दिले मसाल्याची चाचणी करण्याचे आदेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

MDH Everest Controversy | भारतातून अनेक गोष्टी निर्यात होत असतात. यामध्ये मसाले प्रामुख्याने बाहेरील देशांमध्ये निर्यात होत असतात. अलीकडेच एमडीएच आणि एव्हरेस्ट या मसाल्यांवर मोठा वाद झाला. आणि या वादानंतर आता केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारला त्यांच्या मसाल्याची गुणवत्ता तपासण्यासाठी चाचणी करण्याचे आदेश दिलेले आहेत. भारतीय अन्नसुरक्षा आणि प्राधिकरणाने मसाल्याचे नमुने घेण्यास सुरुवात केलेली आहे. तरी देखील कोणत्याही सरकारी संस्थेकडून मसाल्याच्या गुणवत्तेबाबत (MDH Everest Controversy) कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण अद्याप आलेले नाही.

हाती आलेल्या माहितीनुसार उत्तराखंडाच्या बाबतीत राज्याचे अन्नसुरक्षा आयुक्त डॉक्टर आर. राजेश कुमार यांनी उत्तराखंडमध्ये मसाल्याच्या चाचणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. उत्तराखंडमध्ये जवळपास 50 पेक्षा जास्त मसाले उत्पादक कंपन्या आहेत. यावेळी अन्नसुरक्षा आयुक्त म्हणाले की, सर्व 13 जिल्ह्यांमध्ये अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांना विविध मसाल्याची गुणवत्ता तपासण्यासाठी मसाले उत्पादक कंपन्यांना भेट देऊन त्यांचे नमुने गोळा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. एका यावेळी एका अहवालात असे म्हटले होते की, एमडीएचने कंपन्यांमध्ये सुरू झालेल्या या वादामुळे (MDH Everest Controversy) भारतातील निम्म्यापेक्षा जास्त मसाल्यांच्या शीपमेंटला धोका निर्माण झालेला आहे.

एमडीएच आणि एव्हरेस्ट हे दोन भारतातील मसाल्यांचे ब्रँड आहेत. जे केवळ देशात नव्हे, तर संपूर्ण जगभरात प्रामुख्याने वापरले जातात. म्हणून त्यांची मागणी देखील आजकाल जास्त आहे. परंतु जर एमडीएच बद्दल बोललो तर, तो जगातील मसाल्यांच्या सर्वात मोठ्या ब्रँड पैकी एक आहे. ही कंपनी दरवर्षी विविध मसाले तयार करते. आणि वर्षाला कोट्यावधी रुपयांचा व्यवसाय करत असते. जगातील 100 पेक्षा जास्त देशांमध्ये या कंपनीचे मसाले वापरले जातात. एमडीएच कारखान्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या मशीन या एका दिवसामध्ये 30 टनापेक्षा जास्त मसाले तयार करतात.