Measles | वर्षाच्या अखेरीस अर्ध्याहून अधिक जग येणार गोवरच्या धोक्यात, WHO ने संशोधनातून काढला अंदाज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Measles | कोरोना महामारीनंतर माणसाच्या आरोग्यामध्ये अनेक बदल आलेले आहे. तेव्हापासून सगळेच आरोग्याची विशेष काळजी घेतातn अगदी छोटा आजार झाला तरी लगेच डॉक्टरांकडे जातात. अशा जागतिक आरोग्य संघटनेने एका नवीन आजाराचा इशारा दिला आहे. तो म्हणजे आता जगातील अर्ध्यापेक्षा जास्त देशांमध्ये गोवर हा आजार पसरलेला आहे. अलीकडे जगातील अनेक भागांमध्ये या संसर्गजन्य रोगाच्या प्रकरणांमध्ये वाढ झालेली आहे.

या रोगाच्या लसीकरणाचा दर सध्या जगभरात 83 टक्के आहे. जागतिक आरोग्य संघटनेचा असा अंदाज आहे की, 2024 पर्यंत जगभरात 142 दशलक्ष मुलांना या गोवरची लागण होण्याचा धोका आहे. यातील बरेच लोक कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये राहतात. तर आता या आजारासंबंधी सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

गोवर म्हणजे काय?

गोवर हा एक संसर्गजन्य रोग आहे. गोवर नावाच्या विषाणूमुळे हा आजार होतो. हा संक्रमित आजार व्यक्तीच्या खोकल्यामुळे किंवा शिंकल्यामुळे पसरतो. यामुळे गंभीर आजार होतात. त्याचप्रमाणे याला वेळेवर उपचार नाही मिळाले, तर मृत्यू देखील होऊ शकतो. हा रोग लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत होऊ शकतो.

गोवरची लक्षणे | Measles

गोवरची लक्षणे हे विषाणूच्या संपर्कात आल्यानंतर 10 ते 14 दिवसांनी चालू होतात. ही लक्षणे साधारण 7 दिवस टिकतात.

  • सर्दी
  • खोकला
  • लाली आणि लाल आणि पाणीदार डोळे होणे
  • गालाच्या आतील भागात पांढरे डाग येणे
  • चेहरा मान हात आणि पायावर पुरळ येणे

गोवर कसा पसरतो?

गोवर हा जगातील सर्वात संसर्गित रोगांपैकी एक आहे. हा संक्रमित व्यक्तीच्या खोकल्यामुळे किंवा शिंकेने होत असतो. हा विषाणू हवेत किंवा संक्रमित पृष्ठभागावर 2 तासापर्यंत जिवंत असतो. गोवरची लागण झालेली व्यक्ती त्यांच्या लसीकरण न केलेल्या जवळच्या संपर्कांपैकी 9 लोकांना संक्रमित करू शकते.

कोणत्या लोकांना गोवर होण्याची शक्यता जास्त असते

जर एखाद्या गर्भवती महिलेला गोवर झाला, तर त्या व्यक्तीसाठी ते खूप धोकादायक असते. त्यामुळे बाळाचे वजन कमी होऊ शकते आणि अकाली बाळाला जन्म येऊ शकतो. कमी वयाच्या मुलांमध्ये तसेच 30 वर्षापेक्षा जास्त लोकांमध्ये देखील हा विषाणू लवकर पसरतो.

गोवर प्रतिबंध

गोवर टाळण्यासाठी लसीकरण करणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे सर्व मुलांना गोवरची लस देणे खूप गरजेचे आहे.