कुणाचा बाजार उठणार? मेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल आज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा जिल्ह्यातील मेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल आज जाहीर होणार असून मतमोजणीसाठी सुरुवात झालेली आहे. काल याठिकाणी मतदान पार पडले होते. मेढा कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये एकूण 18 जागा होत्या. यामधील 6 जागा बिनविरोध झाल्या तर उरलेल्या 12 जागेसाठी 22 उमेदवार रिंगणात उभे राहिले होते. आज या बाजार समितीचा निकाल जाहीर होणार असून नेमका कोणाचा बाजार उठणार, आणि गुलाल कोणाच्या अंगावर पडणार याची उत्सुकता संपूर्ण सातारा जिल्ह्याला लागली आहे.

काल 7 मतदान केंद्रांवर 2 हजार 230 पैकी 1 हजार 958 सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. 84.32% असा विक्रमी मतदान करत सदस्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. मेढा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजप राष्ट्रवादी युतीतुन एकत्र आले आहेत त्यामुळे एक वेगळ समीकरण सातारा जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी गट, ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट हे तिन्ही पक्ष आमदार गटाला टक्कर देत विरोधात निवडणूक लढत आहे.

भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील हे तिघे एकत्र येऊन या ठिकाणी लढत आहेत. त्यामुळे मेढा बाजार समितीमध्ये भाजप-राष्ट्रवादी असे समीकरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर राष्ट्रवादीचे दीपक पवार, ठाकरे सेनेचे सदाशिव सपकाळ, शिवसेना शिंदे गटाचे संदीप पवार एकत्र येऊन निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे आज या निवडणुकीत महाविकास आघाडी पॅनल चे उमेदवार जिंकणार की शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार बाजी मारणार हेच पाहावं लागणार आहे.