वैद्यकीय परीक्षा 15 जुलैपासून; विद्यार्थ्यांना गावात परीक्षा देण्याची मुभा

0
36
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । वैद्यकीय परीक्षा 15 जुलैपासून घेतल्या जाणार असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून विद्यार्थी शिकत असलेल्या महाविद्यालयात तसंच गावाजवळच्या परीक्षा केंद्रांवर त्यांना परीक्षा देता येणार आहे. केंद्रीय परिषदांनी दिलेल्या निर्देशानुसार आणि विद्यापीठ परीक्षा मंडळाच्या ठरावानुसार उन्हाळी 2020 वैद्यकीय परीक्षा 15 जुलैपासून घेण्याचे (प्रथम वर्ष वैद्यकीय अभ्यासक्रम 2019 वगळून) विद्यापीठाने जाहीर केले आहे. यासंबंधीचे अभ्यासक्रम निहाय वेळापत्रक लवकरच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाणार आहे.

परीक्षार्थी आणि महाविद्यालयांच्या सोयीसाठी ही परीक्षा टप्प्याटप्प्याने घेतली जाईल. कोरोनाच्या संसर्ग काळात विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून गावातच किंवा विद्यार्थी ज्या महाविद्यालयांमध्ये शिकत आहेत, त्याच ठिकाणी त्यांची प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यानुसार विद्याशाखा आणि जिल्हानिहाय परीक्षा केंद्रांची यादी आठ ते दहा दिवसांमध्ये विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिली जाईल. तसेच कोरोनाच्या संसर्गामुळे यंदा विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीनुसार परीक्षा केंद्र बदलता येणार.

कोरोना व्हायरसमुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे वैद्यकीय परीक्षा अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. यानंतर वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांची भेट घेऊन चर्चा केली. वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा येत्या 15 जुलैपासून घेण्याची विद्यापीठाची तयारी आहे. तसा प्रस्तावही विद्यापीठाने दिला आहे. याबाबत राज्यपालांना माहिती दिल्याचे, अमित देशमुख यांनी सांगितले होतं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here