कोण आहे ही महिला ? ज्यांनी मुंबईत विकत घेतलं देशातलं सर्वात महागडं घर! किंमत ऐकून थक्क व्हाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबईत आलिशान घरांच्या विक्रीत पुन्हा एकदा इतिहास घडला आहे. देशातली सर्वात महागडी रेसिडेन्शियल प्रॉपर्टी विकत घेणाऱ्या व्यक्तीचं नाव सध्या चर्चेत आहे. लीना गांधी तिवारी. त्यांनी वरळीमधील समुद्रकिनारी असलेल्या ‘नमन जाना’ या टॉवरमधील एक डुप्लेक्स अपार्टमेंट तब्बल 639 कोटी रुपयांना खरेदी केलं आहे. हे सौदा इतक्या प्रचंड किंमतीत झाला आहे की, सर्वसामान्यांनाच नाही तर रिअल इस्टेट क्षेत्रालाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.

639 कोटींचं घर, भारतातील आतापर्यंतचा सर्वात महाग डील

‘नमन जाना’ ही 40 मजली प्रीमियम इमारत वरळी सी फेस परिसरात आहे. लीना गांधी तिवारी यांनी या टॉवरमधील 32व्या ते 35व्या मजल्यांवरील दोन डुप्लेक्स युनिट्स खरेदी केल्या आहेत. एका चौरस फूटासाठी 2.83 लाख रुपये इतकी विक्रमी किंमत त्यांनी मोजली आहे. या व्यवहारात 63.9 कोटी रुपये केवळ स्टॅम्प ड्युटी आणि GST म्हणून भरले गेले आहेत. ही प्रॉपर्टी 22,572 चौरस फूट क्षेत्रफळाची आहे.

कोण आहेत लीना गांधी तिवारी?

लीना गांधी तिवारी या प्रसिद्ध फार्मा कंपनी USV प्रायव्हेट लिमिटेड च्या चेअरपर्सन आहेत. त्या कंपनीचे संस्थापक विठ्ठल गांधी यांच्या नात आहेत. ही कंपनी 1961 मध्ये रेवलॉनसोबत सुरू करण्यात आली होती. फोर्ब्सनुसार, 29 मे 2025 रोजी त्यांची एकूण संपत्ती 3.9 अब्ज डॉलर्स इतकी आहे. म्हणजे सुमारे 32,000 कोटी रुपये त्या भारतातील नामवंत उद्योजिका फाल्गुनी नायर (Nykaa) आणि किरण मजूमदार-शॉ (Biocon) यांच्याही पुढे आहेत.

USV – एक आघाडीची फार्मा कंपनी

USV लिमिटेड ही डायबेटीस, हृदयविकार, बायोसिमिलर्स आणि अ‍ॅक्टिव फार्मा इंग्रेडिएंट्स निर्मितीत आघाडीवर आहे. कंपनीचं वार्षिक उत्पन्न सुमारे 511 मिलियन डॉलर्स आहे. लीना तिवारी यांचे पती प्रशांत तिवारी हे IIT आणि Cornell यांचे माजी विद्यार्थी असून, कंपनीच्या धोरणात्मक निर्णयांमध्ये ते महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

वरळीला श्रीमंत आणि प्रभावशाली लोकांची पसंती

वर्ली हे मुंबईतील एक महत्त्वाचं आणि ‘हाय-एंड’ रिअल इस्टेट ठिकाण आहे. येथून बांद्रा-वर्ली सी लिंक, नरिमन पॉइंट व नवीन इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स सहज उपलब्ध आहेत. काही दिवसांपूर्वीच उदय कोटक यांनीही वर्ली सी फेसवर 400 कोटी रुपयांचा बंगला विकत घेतला होता. आता वर्ली हे देशातील श्रीमंत, उद्योजक आणि सेलिब्रिटींसाठी ‘फर्स्ट चॉइस’ बनलं आहे.

लीना गांधी तिवारी यांच्या प्रॉपर्टी डीलने केवळ रिअल इस्टेट मार्केटच नव्हे, तर उद्योगविश्वातही एक नवा बेंचमार्क सेट केला आहे. एवढी प्रचंड रक्कम घर खरेदीसाठी देणं ही केवळ संपत्तीच नव्हे, तर भारतीय महिलांच्या वाढत्या आर्थिक ताकदीचंही प्रतीक आहे.