अधिसभेच्या 3 रिक्त जागांसाठी स्थायी समितीची बैठक संपन्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विविध प्रकरणावरील रिक्त झालेल्या जागांवर सदस्यांचे नामनिर्देशन करण्यासाठी गुरुवारी स्थायी समितीची बैठक घेण्यात आली. प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाट यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत 12 जुलै रोजी अधिसूचना जारी करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रामुख्याने सभेच्या वतीने रिक्त जागा भरण्यात येणार आहे.

विद्यापीठीय अध्यापक प्रवर्गातून समाजशास्त्र विभागाच्या प्रा. डॉ. स्मिता अवचार सेवानिवृत्त झाल्या आहेत. अधिसभेवर निवडून आल्या होत्या. संलग्नित महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे मतदारसंघातून डॉ. अली अब्बास जाकिर अली निवृत्त झाले आहेत. त्याशिवाय संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमधून एक जागा रिक्त आहे. देवगिरी महाविद्यालयातील कर्मचारी पुंडलिक कचकुरे अधिसभा सदस्य होते. या तिन्ही जागांवर त्या- त्या मतदारसंघातुन प्रतिनिधित्व दिले जाणार आहे. त्याशिवाय अभ्यासक्रमाच्या अभ्यास मंडळावर सदस्यांच्या जागा रिक्त आहेत.

सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 12 जुलै रोजी अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. रिक्त जागांसाठी 28 जुलै ला अर्ज मागवण्यात येणार असून 31 जुलैला छान्नी केली जाईल. वैद्य अर्जाची यादी 9 ऑगस्ट रोजी जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर 21 ऑगस्ट दरम्यान स्थायी समितीची पुन्हा बैठक बोलविण्यात येईल. त्या वेळी रिक्त जागांवर नामनिर्देशन केले जाणार आहे. बैठकीला व्यवस्थापन परिषद सदस्य किशोर काळे, राहुल मस्के, अधिसभा सदस्य डॉ. सतीश दांडगे, शेख जहूर, डॉ. भारत खांदारे आणि कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांची उपस्थिती होती.

Leave a Comment