मुंबई | अखेर राज्यातील बहुचर्चित असलेल्या मेगा भरती वर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. नोकर भरती येणार अशी आशा लावून बसलेल्या अनेक परीक्षार्थींना आता नोव्हेंबर पर्यंत आशा लावून बसावे लागणार आहे.
राज्य शासनाच्या सह्याद्री वाहिनीद्वारे मुख्यमंत्र्यानी मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर
मेगा भरती लांबणी वर टाकण्यात आली आहे, असे जाहिर केले. मराठा समाजातील आरक्षणाबाबत जनतेच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ह्या निर्णयाची घोषणा केली.
या मेगा भरती मध्ये शासकीय विभागातील रिक्त जागांची भरती जिल्हा निवड सेवा मंडळाद्वारे करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्यानुसार ७२ हजार जागा भरण्यात येणार होत्या, परंतु राज्यातील पेटलेल्या मराठा आरक्षणामुळे फडणवीस सरकारला ही बहुचर्चित भरतीचा निर्णय लांबणीवर टाकण्याची वेळ आली आहे.
मराठा आरक्षणाची वैधानिक कारवाई नोव्हेंबरअखेरपर्यंत पूर्ण करणार, सर्वांचे हित जपूनच मेगाभरती : मुख्यमंत्री श्री @Dev_Fadnavis यांचा राज्यातील जनतेशी संवाद #DevendraTalksToMaharashtra pic.twitter.com/cpsOQfROFw
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 5, 2018