रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेसह हार्बर मार्गांवर मेगा ब्लॉक राहणार; प्रवाशांचे होणार हाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| 14 एप्रिल रोजी म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिवशी मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या (Central and Western Railway) मार्गांवर मेगा ब्लॉक (Mega Block) राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल होऊ शकतात. हा मेगा ब्लॉक रेल्वे मार्गावर सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामासाठी घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे – कल्याण अप आणि धिम्या मार्गावर सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासासाठी दुसरा मार्ग निवडावा किंवा रेल्वे विभागाला भेट देऊन तुम्हाला आवश्यक असलेल्या गाड्यांच्या वेळेची माहिती जाणून घ्यावी.

हार्बर मार्गावर ही रविवारी मेगाब्लॉक

रविवारी हा मेगा ब्लॉक ठेवण्यात आल्यामुळे कल्याण दरम्यानची अप आणि धिम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्याचा निर्णय झाला आहे. या सर्व लोकल डोंबिवली, दिवा, मुंब्रा, कळवा आणि ठाणे या स्थानकावर थांबणार आहेत. लक्षात घ्या की, हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक असणार आहे. यासह, कुर्ला – वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक असेल. या कारणामुळे सकाळी 11.10 ते 4.10 पर्यंत धावणाऱ्या सीएसएमटी – पनवेल, बेलापूर, वाशी लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.

परंतु, सीएसएमटी – कुर्ला आणि पनवेल – वाशी दरम्यान विशेष लोकल धावतील. रविवारी सकाळी 10 ते दुपारी 3 दरम्यान पश्चिम रेल्वेवर बोरिवली – गोरेगाव जलद मार्गावर धावणाऱ्या ही काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे रविवार निमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांना मेगा ब्लॉकचा त्रास सहन करावा लागणार आहे. दरम्यान, रविवारी बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असल्यामुळे दादर शैता भूमीवर मोठी गर्दी असेल. अशातच लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांशी मेगा ब्लॉकमुळे मोठी अडचण होईल.