सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! होमगार्डच्या 10 हजार रिक्त पदांसाठी मेगा भरती; आजच करा अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण होमगार्ड पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेची अधिसूचना देखील नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार, तब्बल 10 होमगार्डच्या रिक्त पदांसाठी (Home Guard Bharti) तरुणांची भरती करण्यात येणार आहे. या भरतीच्या माध्यमातून अनेक तरुणांना रोजगार मिळणार आहे. तसेच सरकारी नोकरी उपलब्ध होणार आहे.

अधिक माहिती जाणून घ्या

डायरेक्ट्रेट जनरल ऑफ होम गार्ड्स, गवर्नमेंट ऑफ एनसीटी ऑफ दिल्ली यांच्याकडून डबल 10 हजार होमगार्डच्या रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 फेब्रुवारी 2024 आहे. या तारखेच्या आत इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावा. उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही.

अर्ज कसा करायचा?

ज्या तरुणांना या पदासाठी अर्ज करायचा आहे त्यांनी, dghgenrollment.in. या साईटवर जाऊन अर्ज करावा. या वेबसाईटवर तुम्हाला भरती प्रक्रिया संदर्भात अधिक माहिती मिळेल. dghgenrollment.in. या वेबसाईटवर तुम्ही 24 जानेवारीपासून अर्ज करू शकता. अर्जाची अंतिम तारीख 13 फेब्रुवारी अशी आहे.

वयोमर्यादा

होमगार्ड भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 20 ते 45 दरम्यान असणे आवश्यक आहे. या वयाच्या खाली किंवा वरती असणाऱ्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार नाही. उमेदवारांना ही बाब लक्षात घेणे गरजेची आहे की, होमगार्डची नोकरी ही केवळ तीन वर्षांसाठीच असणार आहे. तीन वर्षानंतर या नोकरीची मर्यादा संपेल.

निवड प्रक्रिया/ शिक्षण

होमगार्ड भरती प्रक्रियेसाठी लेखी परीक्षा फिजिकल आणि मेजरमेंट टेस्ट घेण्यात येणार आहे. जे उमेदवार बारावी पास आहेत ते या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. तसेच, ससर्विसमॅन आणि एक्स सीएपीएफ दहावी पास असलेल्या उमेदवार देखील अर्ज करू शकतात.