पुरुषांचे नग्न आंदोलन!! खोटी जात प्रमाणपत्रे असलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; पहा Video

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या छत्तीसगड विधानसभेचे अधिवेशन सुरू असून यावेळी खोटी जात प्रमाणपत्रे असलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी करत छत्तीसगड विधानसभेवर तरुणांनी नग्न निषेध नोंदवला. यावेळी अनेक तरुण लक्ष वेधण्यासाठी कपड्यांशिवाय रस्त्यावर उतरताना दिसले. खरं तर बनावट जात प्रमाणपत्रांवर कारवाई करण्याची मागणी नवीन नसली तरी राज्यात पहिल्यांदाच अशा प्रकारचा निषेध करण्यात आला आहे.

सदर आंदोलनातील तरुण हातात फलक घेऊन रस्त्यावरून फिरताना दिसत होते, पण त्यांच्या अंगावर कपडे नव्हते. बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे नोकऱ्या मिळवून देणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी या फलकांवर करण्यात आली होती. रस्त्यावर नग्न अवस्थेत आंदोलन करणारे तरुण जेव्हा त्यांना कोणतेही VVIP वाहन दिसेल तेव्हा त्यांचा निषेध सत्तेत असलेल्या लोकांच्या लक्षात येईल या आशेने धावताना दिसले.

छत्तीसगडमध्ये सरकारी नोकरीसाठी वापरल्या जाणाऱ्या बनावट जात प्रमाणपत्राचा मुद्दा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. सन 2021 मध्ये, PWD कार्यकारी अभियंत्याला बनावट अनुसूचित जमाती (ST) जात प्रमाणपत्र वापरल्याबद्दल निलंबित करण्यात आले. सरकारी नोकऱ्या मिळवण्यासाठी उमेदवारांनी वापरलेल्या बनावट जात प्रमाणपत्राविरोधात आंदोलन करणाऱ्यांनी वारंवार मागणी करूनही विभागाकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याचा आरोप करत आहेत.

निदर्शने करणाऱ्यांनी सांगितले की, बनावट जात प्रमाणपत्रे असलेले लोक पात्र नसतानाही नोकरीचे सर्व भत्ते उपभोगतात आणि तरीही राज्य आयोग अशा कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई करण्यास नकार देत आहे.