हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नवरात्र उत्सव आपल्या भारतातील सगळ्यात मोठा आणि पवित्र सण मानला जातो. या नऊ दिवसांमध्ये दुर्गामाता ही पृथ्वीवर अवतरते असे म्हटले जाते. आणि तिच्या भक्तांच्या इच्छा देखील पूर्ण करत असते. या घटस्थापने निमित्त तसेच नवरात्रात वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगवेगळ्या प्रथा असतात. आणि त्यानुसार लोक भक्ती भावाने पूजा करत असतात. परंतु अहमदाबादच्या एका शहरात एक अनोखी प्रथा पाळली जाते. ती म्हणजे साधू माता नी पोल मध्ये दरवर्षी नवरात्रीच्या आठव्या दिवशी 200 वर्षे जुनी प्रथा येथे पाळली जाते. या बोराट समाजातील पुरुष या दिवशी साडी नेसतात. आणि गरबा खेळतात. असे म्हटले जाते की, पूर्वी या समाजाला एक शाप मिळाला होता. आणि त्या शापामुळे ही प्रथा पाळली जाते.
ही परंपरा दोनशे वर्षांपासून चालू झालेली आहे. साधूबेन नावाच्या एका महिलेने बोराट समाजातील पुरुषाकडे मुघल सरदारापासून सुरक्षा मागितली होती. त्यावेळी हा मुगल सरकार या महिलेल्या काहीतरी करण्याच्या विचारात होता. मात्र त्यावेळी समाजातील पुरुष त्या स्त्रीला वाचवू शकले नाही. आणि ती स्त्री तिच्या मुलांपासून दूर गेली. या सगळ्या परिस्थितीमुळे त्या स्त्रीला खूप दुःख झाले आणि तिने पुरुषांना शाप दिला की, त्यांच्या वंशाच्या सती होण्याआधीच मृत्यू होतील. साधू माता नी पोर या ठिकाणी 1000 पेक्षा जास्त लोक राहतात त्यामुळे अष्टमीच्या दिवशी हे संपूर्ण गाव एकत्र येते.
या ठिकाणी खूप जास्त संख्येने पूर्वी जमतात पुरुष साडी नेसून गरब्याच्या तालावर नाचतात. हा एक सांस्कृतिक लोकनृत्याचा प्रकार आहे. साधू माताच्या सन्मानासाठी हा शाप मिटवण्यासाठी एक मंदिर देखील बांधण्यात आलेले आहे. त्यामुळे प्रत्येक वर्षी या समाजाचे लोक साडी नेसतात आणि गरबा खेळतात. परंतु त्यांच्यासाठी एक शाप असलेली ही परंपरा पर्यटकांना मात्र खूप जास्त आकर्षित करते आणि पुरुषांचा हा गरबा पाहण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने गर्दी होते.
ही प्रथा केवळ शाप मिटवण्यासाठीच केली जात नाही, तर येथील लोक देवीची भक्ती भावाने एका अनोख्या पद्धतीने पूजा करतात. ही देवी या समाजाच्या गेले कित्येक वर्षापासून सुरक्षा करते. आणि त्यांना आशीर्वाद देखील देत असते. नवरात्रीच्या दिवसात हे मंदिर एक भक्ती स्थळ बनलेले असते. येथील रंगीत साड्या सजलेले प्रत्येक वयाचे पुरुष सहभागी होतात. आणि त्यांना पाहण्यासाठी लाखो पर्यटकांची गर्दी जमते.