Menstrual Health | मासिक पाळीत टाळा ‘या’ चुका; अन्यथा होईल मोठे नुकसान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Menstrual Health | मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. प्रत्येक महिलांमध्ये दर महिन्याला ही प्रक्रिया घडत असते. या दिवसांमध्ये आरोग्याची विशेष काळजी घेणे, खूप गरजेचे आहे. अन्यथा तुम्हाला वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते. अनेकदा महिलांना याबाबत माहिती नसते. आणि त्या मासिक पाळीमध्ये अनेक चुका करतात. त्यामुळे त्यांना तीव्र वेदनेला सामोरे जावे लागते. आज आम्ही तुम्हाला मासिक पाळीत कोणत्या चुका टाळाव्यात याबद्दल सांगणार आहोत.

जास्त पेन किलर खाणे | Menstrual Health

अनेक स्त्रियांना मासिक पाळीच्या वेळेस खूप त्रास होतो. त्यामुळे त्या पेनकिलर औषधे खातात. परंतु जास्त पेन किलर खाणे देखील तुमच्या शरीरासाठी हानिकारक आहे. या औषधांच्या जास्त सेवनाने हृदयाला देखील नुकसान होते. त्याचप्रमाणे हृदयविकाराचा झटका, किडनी आणि यकृताशी संबंधित समस्या वाढतात.

जास्त वर्कआउट

वर्कआउट केल्याचे खूप फायदे असते. परंतु मासिक पाळी दरम्यान जर तुम्ही जास्त व्यायाम केला, तर त्याचा तुमच्या शरीरावर चुकीचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मासिक पाळी दरम्यान थोडासा हलका व्यायाम करावा.

पॅड न बदलणे | Menstrual Health

मासिक पाळी दरम्यान वेळोवेळी पॅड बदलणे खूप गरजेचे आहे. अन्यथा तुम्हाला संसर्ग होऊ शकतो. यामुळे त्वचेवर खाज येणे, पुरळ उठणे यांसारख्या समस्या येतात. त्याचप्रमाणे निर्माण होणाऱ्या बॅक्टेरियामुळे टॉक्सिक शॉक सिंड्रोम देखील होऊ शकतो. त्यामुळे दर तीन ते चार तासांनी पॅड बदलणे गरजेचे आहे.

पाण्याची कमतरता

मासिक पाळी दरम्यान शरीरात पाण्याची कमतरता भासू देऊ नका. डीहायड्रेशन झाले तर त्याचा परिणाम तुमच्या रक्तप्रवाहावर होऊ शकतो. त्यामुळे मासिक पाळी दरम्यान भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे.