आंध्र प्रदेशच्या तिरुपतीजवळ मर्सिडीज कार आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात, Video आला समोर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हैदराबाद : वृत्तसंस्था – टाटा सन्सचे अध्यक्ष आणि शापूरजी पालोनजी समूहाचे एमडी सायरस मिस्त्री यांच्या मर्सिडीज कारचा अपघात (accident) होऊन त्यांचे अपघाती (accident) निधन झाले होते. यावरून मर्सिडीजच्या हाय अँड लक्झरी कारच्या सेफ्टीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. त्यानंतर आता आणखी एका मर्सिडीज कारच्या अपघाताचा (accident) व्हिडीओ समोर आला आहे.

यामध्ये बेन्झ कार आणि ट्रॅक्टरची धडक होऊन हा अपघात (accident) झाला आहे. हा अपघात (accident) इतका भीषण होता की कारच्या पुढील भागाचा पूर्ण चक्काचूर झाला आहे तर ट्रॅक्टरचे दोन तुकडे झाले आहेत. आंध्र प्रदेशच्या हैदराबादमध्ये हा भीषण अपघात झाला आहे. चंद्रगिरी बायपास रोडवर हा अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातात (accident) कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

मर्सिडीज ही सर्वात सुरक्षित कार समजली जाते. या गाडीला ग्लोबल NCAP टेस्टमध्ये 5 स्टार सेफ्टी रेटिंग देण्यात आले आहेत. या सगळ्या कार योग्य टेस्टिंगनंतरच प्लांटमधून बाहेर काढल्या जातात असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

हे पण वाचा :
निवडणूकीचा बिगूल वाजला ः राज्यात 92 नगरपालिकांचा कार्यक्रम जाहीर
आता IDFC First Bank देणार महागड्या दरात कर्ज, आजपासून MCLR चे नवीन दर लागू!!!
IND vs ENG 1st 20: Rohit Sharma ने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच कर्णधार
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!
येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर