Meta AI in Whatsapp | व्हाट्सअप हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. आजकाल प्रत्येकजण whatsapp वापरतात. व्हाट्सअप हे एक देवाणघेवाणीचे खूप चांगले साधन आहे. अशातच आता व्हाट्सअपची कंपनी मेटाने सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एआय फीचर लॉन्च केलेले आहे. त्यामुळे आता फेसबुक इंस्टाग्राम आणि व्हाट्सअपवर देखील एआय चॅटबॉक्स उपलब्ध झालेला आहे. या चॅटबॉक्समुळे तुम्हाला एका क्लिकवर सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील.
व्हाट्सअप (Meta AI Whatsapp) हे जगात सगळ्यात जास्त वापरले जाणारे प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात जवळपास कोट्यावधी व्हाट्सअपचा वापर करतात. व्हाट्सअपने अनेक फीचर्समध्ये बदल केलेला आहे. व्हाट्सअपद्वारे आपण व्हिडिओ कॉल, वाईस कॉल, डॉक्युमेंट पेमेंट यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे इतर ॲप्सची गरज फार कमी लागत आहे.
आपल्याला जर कोणताही प्रश्न पडला, तर आपण थेट गुगलवर जाऊन त्या प्रश्नाचे उत्तर शोधतो. परंतु आता व्हाट्सअपने ही सुविधा यायच्या माध्यमातून व्हाट्सअपवर देखील उपलब्ध करून दिलेली आहे. whatsapp वर मेटा एआय आयकॉन आहे. त्यामध्ये तुम्ही चॅट बॉक्स ओपन करू शकता. आणि तुम्हाला जे काही प्रश्न आहेत ते विचारू शकता. त्यानंतर अगदी एका सेकंदात तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील.
व्हॉट्असॅपवर एआय कसं वापराल? | Meta AI Whatsapp
- व्हाट्सअपमध्ये गेल्यावर न्यू आयकॉनवर तुम्हाला मेटा एआय आयकॉन दिसेल.
- त्यानंतर तुम्हाला त्या आयकॉनवर क्लिक करायचे आहे.
- क्लिक केल्यावर स्क्रीनवर येणारे संपूर्ण अटी वाचा आणि मान्य करा.
- त्यानंतर तुमचा चॅट बॉक्स सुरू होईल.
- या चॅट बॉक्स वर तुम्हाला हवा तो प्रश्न तुम्ही टाईप करून एंटर करा.
- काहीच सेकंदात तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असेल.
या फिचरचं वैशिष्ट्य काय?
- ज्याप्रकारे तुम्ही रेगुलर चॅट डिलीट करता, त्याच प्रकारे तुम्ही आय चॅट बॉक्सवर विचारलेल्या प्रश्न देखील डिलीट करू शकता.
- त्याचप्रमाणे एआयद्वारे तुम्ही जी काही प्रश्न विचारले असतील ते सगळ्याच प्रश्नांची उत्तरे अचूक मिळतील असे नाही. व्हाट्सअपने हे कबूल देखील केलेले आहे.
- यामध्ये तुम्हाला केवळ इंग्रजीमध्ये उत्तर मिळतील तरीदेखील तुम्ही कोणत्याही भाषेत प्रश्न विचारू शकता.