राज्यातील वीज ग्राहकांचे मीटर बदलणार!! त्याजागी येणार नवीन ‘स्मार्ट मीटर’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| वीज ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लवकरच महाराष्ट्रामधील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलण्यात येणार आहेत. त्याजागी अदानी ग्रुप कंपनीकडून नवीन मीटर बसवले जातील. गुरूवारी या संबंधित सहा टेंडर्सना मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार, भांडुप, कल्याण, कोकण, बारामती, पुणे या भागात नवीन मीटर अदानी कंपनीकडून बसवण्यात येतील. हे सर्व मीटर्स स्मार्ट मीटर असणार आहेत. ज्याचे अनेक फायदे ग्राहकांना घेता येतील. या वीज ग्राहकांना नवीन मीटरची सेवा देण्यासाठी एकूण 26 हजार 921 कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहेत.

नवीन मीटर बसवल्यानंतर सर्व जुन्या मीटरशी संबंधित असणाऱ्या अडचणी दूर होतील. गुरूवारी, RDSS योजनेंतर्गत DBFOOT आधारावर राज्यातील MSEDCL मध्ये स्मार्ट प्रीपेड मीटरिंगसाठी प्रगत मीटरिंग इन्फ्रास्ट्रक्चर प्रदात्याची नियुक्ती करण्यात आली आहे. उर्जा मंत्रालयाच्या निर्देशानुसार, सरकार भारतातील पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडच्या सूचनेप्रमाणे काम करेल. मध्यंतरी राज्यात MSEDCL मध्ये स्मार्ट प्रीपेड मीटरिंगसाठी प्रगत मीटरिंग इन्फ्रास्ट्रक्चर (AMI) सेवा प्रदात्याच्या नियुक्तीसाठी सात टेंडर्स मागवण्यात आले होते. त्यापैकी सहा टेंडर्सला मंजूरी मिळाली आहे.

स्मार्ट मीटर म्हणजे काय?

महाराष्ट्रातील सर्व वीज ग्राहकांना स्मार्ट मीटरची सेवा देण्याची तयारी सरकार करत आहे. या स्मार्ट मीटरचे मोबाईल फोन प्रमाणे ऑनलाइन रिचार्ज करता येतील. तसेच, वेळेवर बिल भरले गेले नाही तर स्वयंचलित वीज खंडीत करण्याची सुविधा स्मार्ट मीटरमध्ये असेल. या स्मार्ट मीटरची किंमत प्रत्येकी 2600 रुपये आहे. परंतु कोणते स्मार्ट मीटर बसवायचे आहे याची निवड ग्राहकांनी ठरवण्यात यावी अशी सूचना महावितरणकडून करण्यात आली आहे. केंद्र सरकार वितरण क्षेत्र योजनेच्या पहिल्या टप्प्यात 22.8 दशलक्ष स्मार्ट मीटर बसवण्याची तयारी करत आहे. या स्मार्ट मीटरचा फायदा ग्राहकांना नक्कीच होईल अशी आशा सरकारला आहे.