MG Comet : इलेक्ट्रिक गाड्यांच्या मार्केटला करंट द्यायला येतेय MG मोटर्सची नवी गाडी; पहा लूक..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींना कंटाळून अनेक ग्राहकांनी आपला मोर्चा इलेक्ट्रिक वाहनांकडे वळवला आहे. गेल्या वर्षभरात इलेक्ट्रिक गाड्यांची वाढती मागणी पाहता अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी आपल्या इलेक्ट्रिक गाड्या बाजारात आणल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ब्रिटिश कार कंपनी एमजी मोटर्स (MG Motors) ने भारतीय बाजारपेठेत आपली नवीन इलेक्ट्रिक कार MG Comet लॉन्च करण्याची तयारी सुरू केली आहे.कंपनीने एक टिझर लाँच करत या कारची झलकही दाखवली आहे.

एमजी कॉमेट इलेक्ट्रिक कारच्या या 13 सेकंदाच्या टीझरमध्ये कारचे इंटीरियर दाखवण्यात आले. यामध्ये तुम्हाला स्टीयरिंग व्हील दिसेल. तसेच कंट्रोल्ससाठी काही बटणे दिलेली आहेत. अवघ्या 13 सेकंदाच्या या टीजरमध्ये कंपनीने हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की एमजी कॉमेट इलेक्ट्रिक कार अनेक स्मार्ट फीचर्ससह सुसज्ज असेल. कंपनीचे म्हणणे आहे की, ही आगामी इलेक्ट्रिक कार खास शहरी भागाला लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे.

कंपनीने जारी केलेल्या टीझरमध्ये आयपॉडसोबतच म्यूजिकलाही तितकीच प्राथमिकता देण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांना म्युजिक आवडत अशा लोकांसाठी एमजी कॉमेट नक्कीच पसंतीला उतरू शकते. कारमधील iPod प्रमाणेच स्टिअरिंगवरही कंट्रोल्स देण्यात आले आहेत. यासोबतच कारच्या केबिनला मेटॅलिक अ‍ॅक्सेंट दिले जाऊ शकतात. केबिनमध्ये हॉरिझॉन्टल एअर कंडिशन व्हेंट्स आणि प्रीमियम मेटॅलिक अॅक्सेंट देण्यात आले आहेत.

कंपनीच्या सध्याच्या इलेक्ट्रिक पोर्टफोलिओमधील ही सर्वात स्वस्त कार असणार आहे. एमजी मोटर्स ही इलेक्ट्रिक कार Wuling Air EV वर आधारित आहे. या इलेक्ट्रिक कारबाबत अधिक डिटेल्स जरी जारी करण्यात आले नसेल तरी सिंगल चार्जवर MG Comet 200 ते 300 किलोमीटरची ड्रायव्हिंग रेंज देऊ शकते असा अंदाज बांधला जात आहे. तसेच ही कार पांढरा, निळा, पिवळा, गुलाबी आणि हिरवा या पाच रंगांमध्ये लॉन्च होण्याची अपेक्षा आहे.