हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय ऑटोमोबाईल मार्केट मध्ये इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दिसायला अतिशय आकर्षक लूक देणाऱ्या आणि इंधनाचा खर्च वाढवणाऱ्या गाड्या ग्राहकांना सुद्धा फायदेशीर ठरत आहेत. ग्राहकांची इलेक्ट्रिक वाहनांना मिळणारी पसंती पाहता सर्वच कंपन्या आपल्या गाड्या इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये बाजारात आणत आहेत. या एकूण सर्व पार्श्वभूमीवर प्रसिद्ध ऑटोमोबाईल कंपनी एमजी मोटरने आपली MG Windsor EV नावाची इलेक्ट्रिक कार बाजारात लाँच केली आहे. आज आपण या इलेक्ट्रिक कारचे खास फीचर्स, रेंज आणि किंमत याबाबत सविस्तर आढावा घेऊयात…
लूक आणि डिझाईन – MG Windsor EV
इतर इलेक्ट्रिक गाड्यांसारखाच MG Windsor EV सुद्धा दिसायला अतिशय आकर्षक आहे, बघताक्षणीच हि कार तुमच्या मनात भरेल इतकी आलिशान अशी कार आहे. कारची लांबी 4295 मिमी, रुंदी 2126 मिमी आणि उंची 1677 मिमी इतकी आहे. तर 2,700 मिमी व्हीलबेस आणि 604 लीटरची बूट स्पेस या इलेक्ट्रिक कार मध्ये देण्यात आली आहे.
इंटेरिअल बद्दल बोलायचं झाल्यास , MG Windsor मध्ये 8.8 इंच TFT डिजिटल मल्टी इन्फॉर्मेशन डिस्प्ले (MID), 15.6 इंच इंटेलिजेंट कंट्रोल पॅनल, एर्गोनॉमिक इटालियन बबल स्टाइल सिंथेटिक लेदर सीट्स उपलब्ध आहेत. केबिनमध्ये 256 कलर ॲम्बियंट लाइटिंगची सुविधा मिळतेय. कारच्या मागील सीटला सोफा स्टाइल देण्यात आली आहे. ज्याला 135 अंशांपर्यंत रिक्लाइंड करता येते.जेव्हा तुम्ही लांबचा प्रवास कराल तेव्हा या सीट मुळे तुम्हाला आरामदायी प्रवासाचा फील येईल.
331 किमीची रेंज-
या कार मध्ये बसवण्यात आलेली इलेक्ट्रिक मोटर 136PS ची पॉवर आणि 200Nm टॉर्क जनरेट करते. या इलेक्ट्रिक कारमध्ये 38 kWh क्षमतेचा लिथियम फेरो फॉस्फेट (LFP) बॅटरी पॅक आहे. 50kW चार्जरसह, त्याची बॅटरी केवळ 55 मिनिटांत 0 ते 80% पर्यंत चार्ज केली जाऊ शकते. तसेच एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर हि इलेक्ट्रिक कार तब्बल 331 किलोमीटर पर्यंत अंतर पार करेल असा कंपनीचा दावा आहे. एमजी मोटरची ही इलेक्ट्रिक कार 80 पेक्षा जास्त कनेक्ट केलेल्या वैशिष्ट्यांना आणि 100 पेक्षा जास्त व्हॉइस कमांड सिस्टमला समर्थन देते. यात डिजिटल कीचीही सुविधा सुद्धा आहे.
कंपनीने ग्राहकांच्या सुरक्षेकडे सुद्धा लक्ष्य दिले आहे. त्यानुसार कार 35 पेक्षा जास्त सुरक्षा वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. ज्यामध्ये 6 एअरबॅग्ज, सर्व चाकांवर सर्व-डिस्क ब्रेक, इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक, ऑटो होल्ड, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS), अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS), EBD, इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण, हिल-होल्ड यांचा समावेश आहे. या इलेक्ट्रिक कारची सुरुवातीची किंमत 9.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे