हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Mhada And Cidco Housing Lottery स्वतःच्या हक्काचे घर असावे असे अनेक लोकांचे स्वप्न असते आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता म्हाडा आणि सिडको अनेक नागरिकांना मदत करत आहेत. म्हाडाच्या मदतीने अनेक लोकांचे स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. स्वतःच्या खिशाला परवडणाऱ्या दरात आणि जास्त कर्ज न घेता सर्वसामान्यांना शहरात किंवा शहराला लागून असणाऱ्या क्षेत्रांमध्ये ही घर उपलब्ध होतात. आता घराच्या शोधात असणाऱ्यांसाठी म्हाडा आणि सिडकोच्या वतीने काही महत्त्वाचे निर्णय घेणार आलेले आहेत. ज्याचा फायदा अनेक लोकांना होणार आहे.
आता म्हाडाच्या सोडतीत असणारी घरे आणि विना विक्री उपलब्ध असलेली घरे म्हाडाकडून मास बुकिंगच्या माध्यमातून सवलतीसह उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. म्हाडाच्या कोकण मंडळाकडून या संदर्भात निर्णय देखील घेण्यात आलेला आहे. म्हाडासोबत आता सिडकोने देखील या विविध प्रकल्पातील उर्वरित विक्रीसाठी पाऊल उचलण्यास सुरुवात केलेली आहे.
घर खरेदीत मिळणार सवलत? | Mhada And Cidco Housing Lottery
सध्या विरार येथे म्हाडाच्या कोकण मंडळाची जवळपास 5000 घर विक्रीसाठी आहेत. अशातच एकाच वेळी 100 घरांची नोंदणी करण्यास सफल असणाऱ्या शासकीय अथवा खाजगी संस्थांना घरांच्या 15 टक्क्यांनी सवलत देण्यात आलेली आहे. त्यामुळे म्हाडा तसेच सिडको करून देखील उरलेल्या प्रकल्पातून विक्री करण्याची तयारी केली जात आहे.
गेल्या चार वर्षांमध्ये सिडकोने नवी मुंबईतील विविध भागांमध्ये 25 हजारांपेक्षा अधिक घर विकलेली आहेत. त्यातील 8000 घरांची विक्री मात्र अजूनही झालेली नाहीये. भविष्यातील विविध उत्पन्न गटांच्या अनुषंगाने सिडकोकडून 86000 घरांचे बांधकाम हाती घेण्यात आलेले आहे. परंतु त्यापैकी आतापर्यंत 40,000 घरांचे बांधकाम शेवटच्या टप्प्यात असूनही सिडकोच्या घरांना प्रतिसाद मात्र कमी झालेला आहे. त्यामुळे कमी किमतीत ही घरे विकण्याचा निर्णय घेतलेला आहे.