Mhada Lottery 2024 : म्हाडाच्या कोकण मंडळातील सर्वात महागडे घर 69 लाखांना ; कुठे आहे ठिकाण ?

mhada konkan
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Mhada Lottery 2024 : म्हाडा कडून कोकण मंडळासाठी तब्बल 12 हजार घरांची लॉटरी काढण्यात आली आहे. दिनांक (11) रोजी दुपारी 12 वाजता 12 हजार 626 सदनिकांच्या विक्रीसाठी ही सोडत जाहीर झाली आहे. त्यापैकी ठाण्यातील एका घराची किंमत समोर आली असून कोकण मंडळातील हे सर्वात महागडे घर असून त्याची किंमत 69 लाख आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हे घर ठाण्यातील बाळकूम येथील असून त्याची किंमत 68 लाख 97 हजार 160 आहे. हे घर माध्यम उत्पन्न गटासाठी आहे. क्षेत्रफळ 67.6 चौरस मीटर आहे. याकरिता 15 हजार रुपये अनामत रक्कम आकारली जाणार आहे. बाकी सर्व 11000 सदनिका विक्री अभावी पडून असलेल्या गृह प्रकल्पांमधील आहेत. मिळालेल्या माहितीनुसार जुन्या सोडतील सदनिका या मुख्य रेल्वे स्थानकापासून (Mhada Lottery 2024) दूरच्या अंतरावर आहेत या 11,187 सदनिकांची विक्री प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्त्वावर केली जाणार आहे.

कोणत्या शहरांचा समावेश (Mhada Lottery 2024)

कोकण मंडळाच्या अंतर्गत ठाणे शहर व जिल्हाा, कल्याण, टिटवाळा, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गातील ओरोस, वेंगुर्ला आणि मालवण येथील घरांचा समावेश आहे.

सदनिकांचे वाटप (Mhada Lottery 2024)

  • कोकण मंडळाच्या या सोडतीत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गंत अत्यल्प उत्पन्न गटासाठी 9883 सदनिका
  • 15 टक्के एकात्मिक शहर योजनेअंतर्गंत 512 सदानिका
  • 20 टक्के सर्वसमावेशक योजनेंतर्गंत एकूण 661 सदनिका
  • मंडळाच्या विखुरलेल्या 131 सदनिकांचाही समावेश आहे.

प्रथम येणाऱ्यास प्राधान्य (Mhada Lottery 2024)

दरम्यान, म्हाडा कोकण मंडळाच्या घरांची विक्री प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर करण्याचा निर्णय कोकण मंडळाने घेतला आहे. त्यानुसार, प्रथम प्राधान्य योजनेंतर्गंत या घरांची विक्री करण्यात येणार आहे. शेवटच्या घराची विक्री होईपर्यंत अर्ज विक्री-स्वीकृती आणि ताबा प्रक्रिया सुरू राहणार. या घरांसाठी अर्ज दाखल करण्यास सुरुवात 11ऑक्टोबरपासून होणार आहे. तर, ही प्रक्रिया 10 डिसेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. यानंतर या लॉटरीची सोडत 27 डिसेंबर रोजी काढली जाणार आहे.

कुठे कराल अर्ज ? (Mhada Lottery 2024)

अर्जदारांना म्हाडाच्या प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेसाठी https://lottery.mhada.gov.in आणि कोकण म्हाडा सोडतीसाठी अर्ज करणाऱ्यांना https://housing.mhada.gov.in या वेबसाईटवर अर्ज दाखल करता येणार आहेत.