हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Mhada Lottery 2025 – म्हाडातर्फ सर्वसामान्यांना लॉटरी पद्धतीने कमी किंमतीत घरे उपलब्ध करून दिली जातात . म्हाडाच्या घरांसाठी 3662 जणांना घरे देण्यात आली आहेत. पण या घरांच्या उपलब्धतेसाठी 93 हजार 662 अर्ज आले होते, त्यामध्ये 71 हजारांहून अधिक जणांनी प्रक्रिया पूर्ण केली होती. हि घरे उपलब्ध करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये म्हाडाचे नवे धोरण समोर आणले. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, सरकार सर्वसामान्य लोकांच्या गृह स्वप्नांना आकार देण्यासाठी कटिबद्ध आहे. विशेषतः महिलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल आणि परवडणारी घरे उभारण्यासाठी नवीन धोरण लागू केले जात आहे. या धोरणामुळे महिलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि विद्यार्थ्यांना मोठी खुशखबर मिळाली आहे. तर चला जाणून घेऊयात याबद्दल अधिक माहिती.
रखडलेले प्रकल्पही मार्गी लावले (Mhada Lottery 2025)-
शिंदे म्हणाले की, “सर्वसामान्य लोकांना महागडी घरे घेणे शक्य होत नाही, त्यामुळे म्हाडाच्या माध्यमातून त्यांना हक्काचे घर मिळवून देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. म्हाडाची सोडत प्रक्रिया पारदर्शक आणि ऑनलाइन असते, त्यामुळे ब्रोकर किंवा इतर कोणत्याही समस्यांचा सामना लोकांना करावा लागणार नाही.” गेल्या दीड वर्षांत म्हाडाने 13 सोडती (Lottery) काढून 13 हजार घरे लोकांना वाटण्यात आली आहेत. यामध्ये रखडलेले प्रकल्पही मार्गी लावले गेले आहेत. तसेच, चेंबूरमध्ये 17 हजार घरांचा प्रकल्प एसआरए आणि एमएमआरडीच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे. ठाण्यात विविध ठिकाणी 4 ते 5 क्लस्टर प्रकल्प सुरू आहेत.
परवडणारी घरे उपलब्ध –
MHADA (महाराष्ट्र हाउसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट अथॉरिटी) लॉटरी पद्धत ही महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईसारख्या शहरांमध्ये, परवडणारी घरे उपलब्ध करण्यासाठी वापरली जाते. यामध्ये सरकारी किमतीत घरे मिळवण्यासाठी नागरिकांना लॉटरी (Mhada Lottery 2025) प्रक्रियेचा वापर करावा लागतो. या लॉटरी पद्धतीने सर्वसान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
हे पण वाचा : महाविद्यालयीन निवडणुका पुन्हा सुरु होणार? मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत मोठी भरती; असा करा अर्ज