Mhada Lottery : सध्याच्या महागाईच्या जमान्यात घर घेणे म्हणजे मोठे अवघड काम झाले आहे. मोठ्या शहरांमध्ये घरांच्या किंमती कोटींच्या घरात जाऊन पोहचल्या आहेत. अशा स्थितीत घर पाहण्यापासून ते अगदी हप्ता सुरु होण्यापर्यंत मोठ्या जोखमीतून जावे लागते. अशा स्थितीत सर्वसामान्य कुटुंबाना त्यांच्या स्वप्नातलं घर पूर्ण करण्यासाठी म्हाडा सारखी संस्था पुढे येते. म्हणूनच म्हाडाच्या लॉटरीची (Mhada Lottery) वाट अनेकजण पाहत असतात. आता म्हाडाच्या पुणे मंडळासाठी एक महतवाची अपडेट हाती आली आहे.
लवकरच मुंबई म्हाडाची सोडत जाहीर होणार आहे. मात्र पुणेकरांसाठी एक खुशखबर आहे कारण पुण्यासाठीची एक सोडत नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. पण सोडतीसाठी इच्छुकांची एकूण संख्या पाहता सध्याची उपलब्ध गृह संख्या पुरेशी नसल्याची बाब लक्षात घेऊन म्हाडा ने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. पुणे म्हाडाची दुसरी सोडत लवकरच काढली जाणार आहे. याबाबतची माहिती गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे. बुधवारी 18 जुलै 2024 ला पुणे म्हाडाची 4850 घरांची संगणकीय सोडत काढण्यात आली. या सोडतीत ज्यांना घर मिळालं नाही त्यांना दुसऱ्या सोडतीत संधी मिळणार आहे. असं त्यांनी स्पष्ट केलं त्यामुळे म्हाडाने (Mhada Lottery) मनावर घेतल्यामुळे आता अनेक इच्छुकांना त्यांच्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करता येणार आहे.
दरम्यान म्हाडाच्यावतीने (Mhada Lottery) येत्या काळात 7500 घरांची मेगा सोडत काढली जाणार आहे. यामध्ये कोकण, पुणे आणि मुंबई मंडळांचा समावेश असणार आहे. म्हाडाच्या घरांना असणारी मागणी आणि सर्वसामान्यांकडून मिळणारा प्रतिसाद पाहता वर्षातून किमान एकदा तरी म्हाडाची सोडत काढली जाणार असल्याची माहिती म्हाडाच्या वतीने काही दिवसांपूर्वीच देण्यात आली होती. त्यामुळे आता महाडा कडून दिला जाणाऱ्या प्रत्येक अपडेट कडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे.
दरम्यान मुंबईच्या डबेवाला संघटनेच्या वतीने म्हाडाच्या सोडतीमध्ये दहा टक्के आरक्षणाची मागणी करण्यात आलेली आहे. याचा परिणाम जनरल प्रवर्गावर होऊ शकतो. याशिवाय येत्या काळात म्हाडा (Mhada Lottery) कडून घरांच्या दरामध्ये साधारणतः 15 ते 50 टक्क्यांची वाढ होण्याची सुद्धा शक्यता असून आता ही वाढ नेमकी किती फरकाने होते याच्या अधिकृत वृत्ताकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे.