हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | म्हाडा अनेक लोकांना त्यांच्या स्वतःचे हक्काचे घर घेण्यासाठी मदत करत असते. आता तुमचे हक्काचे घर घेण्याचे स्वप्न साकार होण्यासाठी तुम्हाला आणखी एक संधी मिळणार आहे. म्हाडा अंतर्गत कोकण गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळ अंतर्गत 2264 घरांच्या विक्रीसाठी जाहीर केली होती. या म्हाडा अंतर्गत अर्ज करण्याची 24 डिसेंबर 2024 ही शेवटची तारीख होती. परंतु आता म्हाडाने (Mhada) ऑनलाईन अर्ज करण्याची मुदतवाढ केलेली आहे. आणि आता 6 जानेवारी 2025 ही म्हाडा अंतर्गत अर्ज करण्याची अंतिम तारीख देण्यात आलेली आहे. याबाबतची माहिती मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी दिलेली आहे.
कोकण मंडळातील म्हाडाच्या घरांच्या सोडतीसाठी 11 ऑक्टोबर 2024 पासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली होती. त्याचप्रमाणे 24 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. परंतु यामध्ये आता वाढ करून 6 जानेवारी 2025 रोजी रात्री 11 वाजून 59 मिनिटापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया बंद केली जाणार आहे. तर 7 जानेवारी पर्यंत उमेदवारांना अनामत रक्कम भरता येईल.
त्याचप्रमाणे सोडतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांची यादी 20 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाणार आहे. तसेच 22 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उमेदवारांना प्रारूप यादी वर आपले दावे आणि हरकती नोंदवता येतील. तुम्ही म्हाडाच्या वेबसाईटवर जाऊन सगळी माहिती घेऊ शकता.
कोकण मंडळांनी 200264 घरांसह 12,626 घरांची विक्री करण्याची तयारी सुरू केलेली आहे. यामध्ये विरारसह इतर भागातील तयार सरांचा देखील समावेश आहे. यासाठी म्हाडा कडून विशेष मोहीम देखील चालवण्यात आली होती. परंतु अनेक प्रयत्न नंतरही कोकण मंडळातील घराची विक्री झालेली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा मुदतवाढ करण्यात आलेली आहे.