Mhada Lottery : स्वप्नातलं घर पूर्ण होणार ! म्हाडाच्या ‘या’ मंडळाची आज सोडत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Mhada Lottery : सध्याच्या महागाईच्या जमान्यात सर्वसामान्यांसाठी घर घेणं ही काही साधी गोष्ट राहिली नाही. मात्र सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याचं काम म्हाडा करते. म्हणूनच म्हाडाच्या लॉटरीसाठी अनेक जण वाट पाहत असतात. म्हाडा मार्फत नवीन घर घेणाऱ्यांसाठी आता एक खुशखबर समोर आली आहे. म्हाडाच्या छत्रपती संभाजी नगर मंडळाच्या अक्षरी छत्रपती संभाजी नगर शहर एकूण 1113 घर आणि 361 भूखंडासाठी सोडत निघणार आहे. दिनांक आज 16 जुलै रोजी ही सोडत निघणार असून जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहामध्ये ही सोडत निघणार आहे.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत 4754 अर्ज आल्याची माहिती समोर आली आहे. तसंच अनामत रकमेस सह 3989 अर्ज प्राप्त झाल्याचे सुद्धा माहिती आहे या घरांमध्ये पंतप्रधान आवास योजना म्हाडा गृहनिर्माण योजना सर्वसमावेशक योजनेच्या घरांचा समावेश आहे. पंतप्रधान आवास योजनेसाठी 425 घरे , म्हाडा गृहनिर्माण योजनेसाठी 20% घरे, सर्वसमावेशक योजनेसाठी 798 घरे, तसेच 361 भूखंड आहेत.

कोणत्या भागांचा समावेश

छत्रपती संभाजीनगर मंडळाच्या आखतारी मध्ये छत्रपती संभाजी नगर शहर, जिल्हा लातूर, जालना, नांदेड, हिंगोली, परभणी आणि धाराशिव येथील विविध गृहनिर्माण योजनांच्या घरांचा समावेश करण्यात आला आहे.

याबाबत माहिती देताना मंडळाचे मुख्य अधिकारी मंदार वैद्य यांनी सांगितले की, म्हाडाची सोडत ही अत्यल्प, अल्प, मध्यम उत्पन्न गटासाठी आहे. तर भूखंड हे सर्व उत्पन्न गटातील लोकांसाठी आहेत. नवीन संगणकीय प्रणाली द्वारे ही सोडत होत आहे. या पद्धतीत नोंदणीकरण आणि अर्जदारांची पात्रता निश्चित झाल्यानंतर पुढे अर्जदार प्रक्रियेत सहभागी होत विजेता घोषित झाल्यानंतर अर्जदारास सूचना पत्र पाठवले जाणार आहेत. तरतुदींची पूर्तता केल्यानंतर विजेत्या अर्जदारांना तात्पुरत्या स्वरूपात बेकार पत्र पाठवले जाणार आहे.