MHADA Mumbai : मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी ! लवकरच मिळणार स्वस्त दरात म्हाडाची घरे

mumbai mhada
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

MHADA Mumbai : मुंबईसारख्या महागड्या शहरात घर घेण्याचं स्वप्न आता सामान्य नागरिकांसाठी पुन्हा साकार होणार आहे. महागाईच्या काळात एक मोठा दिलासा ठरणारी बातमी म्हाडाकडून (MHADA Mumbai) समोर येत आहे. लवकरच परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध होणार आहेत.

मुंबईत घर घेणं हे सर्वसामान्य माणसासाठी स्वप्नवत झालं आहे. किंमती गगनाला भिडल्याने अनेकजण म्हाडाच्या घरांकडे आशेने पाहत होते. पण अलीकडच्या काळात म्हाडाची (MHADA Mumbai) घरेही महाग झाल्यामुळे तीही अनेकांच्या आवाक्याबाहेर गेली होती. मात्र, आता या घरांच्या किमती पुन्हा सर्वसामान्यांसाठी परवडणाऱ्या होणार आहेत.

म्हाडाने घरांच्या दर निश्चित करण्याच्या प्रक्रियेत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी एक त्रिसदस्यीय समिती नेमली आहे. ही समिती “म्हाडाचंही नुकसान होऊ नये आणि सामान्य नागरिकांनाही स्वस्तात घर मिळावं” या तत्त्वावर काम करणार आहे.

समिती पुढील तीन महिन्यांत आपला अहवाल म्हाडा (MHADA Mumbai) उपाध्यक्षांकडे सादर करणार असून, त्यानंतर शासनाची मंजुरी घेतली जाईल. सध्या म्हाडा जमिनीचा दर, बांधकाम खर्च आणि प्रशासनिक खर्च पाहून घरांचे दर ठरवते. अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडा कोणताही नफा न घेताच घरे विकतो, तर मध्यम गटातून 10% आणि उच्च गटातून 15% नफा घेतला जातो.

समस्या अशी आहे की, काही भूखंड जुने असतात आणि त्यांच्या देखभालीवर आलेला खर्चही घरांच्या किमतीत धरला जातो. यामुळे दर वाढतात. असा अतिरिक्त भुर्दंड सामान्य माणसाने का सहन करायचा, हा प्रश्न आता विचारात घेतला जातोय. विशेष म्हणजे, घराचे क्षेत्रफळ न पाहता त्याची किंमत आणि ती कोणत्या उत्पन्नगटात बसते, हे पाहून नव्याने वर्गीकरण करता येईल का, याचाही विचार समिती करत आहे.

म्हाडाच्या सध्याच्या धोरणानुसार (MHADA Mumbai)

  • 300 चौरस फुटांपर्यंत – अत्यल्प उत्पन्न गट
  • 450 चौरस फुटांपर्यंत – अल्प उत्पन्न गट
  • 600 चौरस फुटांपर्यंत – मध्यम उत्पन्न गट
  • 900 चौरस फुटांपर्यंत – उच्च उत्पन्न गट

परंतु, उपनगरात आणि दक्षिण मुंबईत एकाच क्षेत्रफळाच्या घरांमध्ये मोठा दरफरक असतो. त्यामुळे उत्पन्नगट ठरवताना केवळ क्षेत्रफळ नव्हे, तर किंमतही विचारात घेण्यात यावी, असा दृष्टिकोन घेतला जात आहे. यामुळे लवकरच मुंबईतील सर्वसामान्यांसाठी घर घेणं थोडं तरी सोपं होईल, अशी अपेक्षा निर्माण झाली आहे.