MHADA Nashik Lottery : स्वस्तात घर खरेदीची सुवर्णसंधी!! Mhada कडून नाशिकमध्ये 402 घरांसाठी लॉटरी

MHADA Nashik Lottery
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन MHADA Nashik Lottery । आजकाल घर खरेदी करणे काय खायचं काम नाही. खास करून शहरी भागात घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. अशावेळी शहरात घर खरेदीचे अनेकांचे स्वप्न हे स्वप्नच राहतेय. परंतु आता चिंता करू नका. तुम्ही नाशिक मध्ये नवीन घर घेण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी हि बातमी अतिशय महत्वाची आहे. Mhada कडून नाशिकमध्ये 402 घरांसाठी लॉटरी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे नाशिककरांना स्वस्तात व परवडणाऱ्या किंमतीत घरे उपलब्ध होणार आहेत.

कोणकोणत्या भागात घरे उपलब्ध – MHADA Nashik Lottery

म्हाडाच्या नाशिक मंडळातर्फे (MHADA Nashik Lottery) नाशिक भागातील चुंचाळे, पाथर्डी, मखमलाबाद, आडगाव, सातपूर शिवारातील विविध गृहनिर्माण प्रकल्पामधून घरं घेता येणार आहे. यातील ४०२ घरं आगाऊ अंशदान तत्त्वावर विकण्यासाठी लॉटरी काढली जाणार आहे. ही घरं १४ लाख ९४ हजार ते ३६ लाख ७५ हजारापर्यंत आहेत. त्यामुळे नाशिककरांना स्वस्त दरात आणि अतिशय कमी किमतीत घरं खरेदी करता येणार आहे. म्हाडाकडून काढण्यात येणारी घरे ही अॅडव्हान्स कंट्रिब्युशन तत्वावर आहेत. म्हणजेच ही घरे अजूनही बांधलेली नाहीत. लॉटरीत विजेत्या ठरलेल्या अर्जदारांना घरांची विक्री किंमत पाच टप्प्यांत भरता येणार आहे.

नाशिकमध्ये कुठे आणि किती घरं?

अल्प उत्पन्न गटासाठी…

चुंचाळे शिवार – १३८
पाथर्डी शिवार – ३०
मखमलाबाद – ४८
आडगाव – ७७

अशा एकूण २९३ घरांचा या लॉटरीत समावेश आहे.

मध्यम उत्पन्न गटासाठी

सातपूर – ४०
पाथर्डी – ३५
आडगाव – ३४

एकूण १०९ घर उपलब्ध (MHADA Nashik Lottery) आहेत. अर्जदारास 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीतील उत्पन्नाचा पुरावा सादर करणे गरजेचं आहे. अर्जदाराचे आयकर विवरणपत्र अथवा तहसील कार्यालयाचे उत्पन्न प्रमाणपत्र यातील एक उत्पन्न पुरावा ग्राह्य धरला जाईल.