Mhada Pune Lottery : खुशखबर…! पुणे विभागासाठी म्हाडाकडून 4777 घरांसाठी सोडत जाहीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Mhada Pune Lottery : सर्वसामान्यांना हक्काची घरे मिळवून देणारे म्हणून ‘म्हाडा’ प्रचलित आहे. पुण्यामध्ये घर घेणाऱ्यांची स्वप्ने आता लवकरच पूर्ण होणार आहे. कारण पुणे विभागासाठी म्हाडाने सोडत जाहीर केली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड सहित सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्यांचा यामध्ये समावेश असणार आहे.

म्हाडाच्या कार्यालयात सोडतीचा प्रारंभ म्हाडा पुणे (Mhada Pune Lottery) मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते गुरुवारी (७) रोजी करण्यात आला. सोडतीबाबतची यावेळी घोषणा करण्यात आली आहे. यावेळी म्हाडा पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील उपस्थित होते.

कधीपासून करता येणार अर्ज ? (Mhada Pune Lottery)

मिळालेल्या माहितीनुसार पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील अनुक्रमे ७७५ आणि ५६१ घरांचा समावेश आहे. या सोडतीसाठी दिनांक ७ मार्चपासून नोंदणीला सुरुवात करण्यात आली आहे. शुक्रवारपासून म्हणजेच ८ मार्च रोजी दुपारी तीन वाजल्यापासून पासून अर्ज भरता येणार आहे.

‘या’ तारखेपर्यंत करू शकता अर्ज

जर तुम्हाला (Mhada Pune Lottery) ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी करायचे असेल तर त्याची मुदत 8 एप्रिल रोजी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत तर सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत १० एप्रिल रोजी रात्री ११. ५९ पर्यंत असणार आहे. अर्जाचे ऑनलाइन शुल्क भरण्याची मुदत १२ एप्रिलपर्यंत आहे.

या वेबसाईट्स ला भेट द्या (Mhada Pune Lottery)

म्हाडाचे संकेतस्थळ – www. mhada.gov.in किंवा https://mhada.gov.in
‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावरील योजनांच्या सदनिकांसाठी lottery.mhada.gov.in या संकतेस्थळावर नोंदणी करावी

योजना आणि सदनिका यांची आकडेवारी

म्हाडा योजनेंतर्गत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य – २४१६ सदनिका, म्हाडाच्या (Mhada Pune Lottery) विविध योजनेअंतर्गत १८,म्हाडा पंतप्रधान आवास (पीएमएवाय) योजना – ५९,
पंतप्रधान आवास (पीएमएवाय) खासगी भागीदारी योजना (पीपीपी) – ९७८, २० टक्के योजना पुणे महापालिका ७४५ आणि पिंपरी-चिंचवड ५६१ अशा एकूण ४७७७ सदनिकांचा समावेश असेल.