Sudha Murty : सुधा मूर्ती खासदार होणार; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इन्फोसिसच्या सहसंस्थापक नारायण मूर्ती (Narayana Murthy) यांच्या पत्नी आणि लेखिका सुधा मूर्ती (Sudha Murty) याना राज्यसभेचे खासदार करण्यात आलं आहे. सुधा मूर्ती यांची राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा सदस्य म्हणून निवड झाली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी स्वतः ट्विट करत माहिती दिली आहे. इन्फोसिस फाऊंडेशनच्या माध्यमातून त्या मोठ्या प्रमाणात समाजकार्य करत असतात. आता त्या खासदार म्हणून आपल्याला संसदेत दिसतील.

याबाबत मोदींनी ट्विट करत म्हंटल कि, भारताच्या राष्ट्रपतींनी सुधा मूर्ती (Sudha Murty) जी यांची राज्यसभेवर नियुक्ती केल्याने मला आनंद होत आहे. सामाजिक कार्य, परोपकार आणि शिक्षण यासह विविध क्षेत्रात सुधाजींचे योगदान प्रचंड आणि प्रेरणादायी आहे. राज्यसभेतील त्यांची उपस्थिती ही आमच्या ‘नारी शक्ती’चा एक शक्तिशाली पुरावा आहे, जी आपल्या देशाचे नशीब घडवण्यात महिलांच्या सामर्थ्याचे आणि सामर्थ्याचे उदाहरण देते. त्यांना फलदायी संसदीय कार्यकाळासाठी शुभेच्छा.

सुधा मूर्तींनी मानले मोदींचे आभार – Sudha Murty

दरम्यान, सुधा मूर्ती या इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा सुद्धा आहेत. देशातील महिला आणि मुलांसाठी सुद्धा मूर्ती सतत कार्यरत असतात. त्यांनी अनेक प्रेरणादायी पुस्तके सुद्धा लिहिली आहेत. यापूर्वी भारत सरकारने सुधा मूर्ती यांना 2006 मध्ये पद्मश्री आणि 2023 मध्ये पद्मभूषण देऊन सन्मानित केले.. राज्यसभेवर त्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे समजताच त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू आणि पंतप्रधान मोदी यांचे यांचे आभार मानले. महिला दिनानिमित्त हे माझ्यासाठी सर्वात मोठं गिफ्ट असून देशासाठी काम करणं ही एक नवी जबाबदारी आहे, अशा शब्दात सुधा मूर्ती यांनी आपल्या भावना व्यक्त केलं.