सर्वसामान्यांना मिळणार स्वस्तात आलिशान घर; म्हाडाकडून लवकर होणार सोडत जाहीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आपल्याला देखील एखादे स्वस्तात पंचतारांकित घर मिळावे अशी अनेकांची इच्छा असते. परंतु या पंचतारांकित घरांच्या किमती सर्वसामान्यांना परवडण्याच्या बाहेर असतात. त्यामुळे अनेकांचे पंचतारांकित घरामध्ये राहण्याचे स्वप्न तसेच अर्धवट राहते. परंतु आता म्हाडा हे स्वप्न पूर्ण करण्यास मदत करणार आहे. लवकरच म्हाडाकडून (Mhada Lottery) मुंबईतील पंचतारांकीत इमरतीतील घरांसाठी सोडत जाहीर करण्यात येणार आहे. नुकतीच गोरेगावच्या पहाडी एरियामध्ये म्हाडाने 39 मजली निवासी इमारत बांधली आहे. या इमारतीमध्ये सर्व पंचतारांकीत सुविधा उपलब्ध आहेत.

खास म्हणजे, म्हाडाकडून गोरेगावमध्ये बांधण्यात आलेल्या इमारतीत स्विमिंग पूल, विजेवरील वाहनांसाठी चार्जिंग पॉइंट, मैदान, व्यायामशाळा अशा अनेक सुविधा रहिवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सर्वसामान्यांना याच घरांमध्ये राहण्यासाठी म्हाडाकडून एक सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. गोरेगावमध्ये उभारलेल्या म्हाडाच्या या प्रकल्पाचे काम 2024 मध्ये पूर्ण होणार आहे. त्यानंतर या प्रकल्पातील घरांसाठी म्हाडाकडून सोडत जाहीर करण्यात येईल. या प्रकल्पामुळे उच्च आणि मध्यम गटातील खरेदीदारांसाठी एक चांगला पर्याय उपलब्ध होणार आहे.

सध्या गोरेगाव येथील या गृहप्रकल्पाचे बांधकाम 60 टक्के पूर्ण झाले आहे. यातील 39 मजली इमारतील उच्च आणि मध्यम गटातील 332 घरांसाठी 2024 मध्येच सोडत काढण्याचा निर्णयम्हाडाने घेतला आहे. त्यामुळे आता 2024 मध्ये पंचतारांकित घर घेण्याचे स्वप्न अनेकांचे पूर्ण होणार आहे. मुख्य म्हणजे म्हाडाकडून या घरांची सोडत काढण्याचा निर्णय मुंबई मंडळाच्या मालकीच्या पहाडी गोरेगावमधील मोठ्या भूखंडाबाबतचा वाद मिटल्यामुळे घेण्यात आला आहे. खरे तर या घरांसाठीची सोडत 2025 साली काढण्यात येणार होते. परंतु आता ती 2024 मध्येच काढण्यात येणार आहे.

घरांची किंमत आणि आकार

म्हाडाकडून काढण्यात येणाऱ्या सोडतील उच्च गटातील 979.58 चौरस फुटांच्या 227 घरांचा समावेश आहे. तसेच
मध्यम गटातील 794.31 चौरस फूटांच्या 105 घरांचा समावेश प्रकल्पात आहे. म्हणजे त्या प्रकल्पात अशा एकूण 332 घरांचा समावेश आहे. या घरांचे काम 80 टक्के पूर्ण करण्यात आले आहे. तसेच मिळालेल्या माहितीनुसार प्रकल्पातील मध्यम गटाच्या घरांची किंमत अंदाजे 80 लाख रुपये इतकी आहे. उच्च गटातील घरांची किंमत सव्वा कोटी रुपये आहे. परंतु या घरांच्या मूळ किमती म्हाडा मंडळाकडून सांगण्यात आलेल्या नाही.