अखेर मुहूर्त मिळाला! यादिवशी होणार पुणे म्हाडाच्या घरांची सोडत जाहीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| येत्या 5 डिसेंबर रोजी पुणे म्हाडाच्या घरांसाठीची सोडत जाहीर करण्यात येणार आहे. यादिवशी सकाळी ठीक 9 वाजता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार तसेच गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत सर्व विजेत्यांची नावे घोषित होणार आहेत. गेल्या 5 सप्टेंबर रोजी पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर, सांगली येथील 5863 घरांसाठी सोडत काढण्यात आली होती. या सोडतीतील विजेत्यांची नावे आता 5 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहेत.

पुणे जिल्हा परिषद सभागृह येथे 5 डिसेंबर रोजी संगणकीय सोडतील देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत विजेत्यांची नावे जाहीर होतील. यापूर्वी 5 सप्टेंबर रोजी ऑनलाइन पद्धतीने पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर, सांगली येथील घरांच्या सोडतीसाठी अर्ज भरण्यात आले होते. त्यावेळी 5863 घरांसाठी म्हाडाकडे सुमारे 60 हजार अर्ज प्राप्त झाले होते. त्यामुळे या घरांची सोडत कधी जाहीर करण्यात येईल याबाबत सर्वांना उत्सुकता लागून राहिले होती. अखेर 5 डिसेंबर रोजी म्हणजेच 4 महिन्यानंतर घरांची सोडत निघणार आहे.

दरम्यान, पुणे म्हाडाकडे 5863 घरांसाठी 60 हजार अर्ज दाखल करण्यात आले होते. या सोडतीत पुणे जिल्ह्यातील 5425 घरे, सोलापूरमधील 69 घरे, सांगलीतील 32 घरे, कोल्हापूर मधील 337 घरे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली होती. यामध्ये, म्हाडा गृहनिर्माण योजनेतील 403 घरे, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 431 घरे गृहनिर्माण योजनेअंतर्गत 2584 घरे, प्राधान्य योजनेअंतर्गत 2445 या घरांचा देखील समावेश होता.