Mharashtra Rain : महाराष्ट्रात जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. त्यातही मागच्या दोन दिवसात रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसाचा परिणाम रेल्वेच्या वाहतुकीवर झाला असून कोकण रेल्वे मार्गावरील सेवा रविवारी सायंकाळ पासून विस्कळीत झाले असून, या विस्कळीतपणामुळे लांब पल्ल्याच्या पाच गाड्या (Mharashtra Rain) थांबवण्यात आल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे (Mharashtra Rain) रविवारी संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास विन्हेरे (रायगड) आणि दिवाण खवटी (रत्नागिरी) स्थानकांदरम्यान बोगद्याच्या बाहेर दरड कोसळली, त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. मात्र, सुदैवाने दरड कोसळली त्यावेळी एकही गाडी जात नव्हती, त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
कोकण मार्गावरील विविध स्थानकांवर पाच ते सहा लांब पल्ल्याच्या गाड्या थांबवण्यात आल्याची माहिती आहे . मार्ग मोकळा करून लवकरात लवकर सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत माहिती देताना (Mharashtra Rain) अधिकाऱ्यांनी सांगितले की, “एक जेसीबी आधीच घटनास्थळी पोहोचला आहे आणि एक पोकलेन मशीन देखील मार्गावर आहे. सेवा दोन ते तीन तासात पुन्हा सुरू होऊ शकते,” ते म्हणाले होते. मात्र सध्या तेथील परिस्थिती काय आहे याची माहिती अद्याप समोर आली नाही.
महाराष्ट्रातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात रविवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार (Mharashtra Rain) पावसामुळे दरड कोसळल्याने कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत झाली. या आठवड्याच्या सुरुवातीला पावसामुळे गोव्यातील मदुरे-पेरनेम विभागातील पेरनेम बोगद्यात पाणी साचल्याने कोकण रेल्वे मार्गावरील सेवा प्रभावित झाली होती. आता दरड कोसळल्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला.