Milind Narvekar : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी!! मिलिंद नार्वेकर ठाकरेंची साथ सोडणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या सावलीप्रमाणे असणारे आणि गेली अनेक वर्ष ठाकरेंचे निष्ठावान शिवसैनिक म्हणून राहिलेले मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) याना शिंदे गटाने मोठी ऑफर दिली आहे. महायुतीकडून दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी मिलिंद नार्वेकर यांच्या नावाची चर्चा आहे. मिलिंद नार्वेकर यांनी जर शिंदे गटाची ऑफर स्वीकारली तर निवडणुकीच्या काळातच उद्धव ठाकरेंसाठी (Uddhav Thackeray) सर्वात मोठा धक्का असेल.

महायुतीने अजूनही दक्षिण मुंबईची उमेदवारी जाहीर केलेली नाही. दक्षिण मुंबईची जागा शिंदे गटाकडे जाणार कि भाजपकडे हे अजून स्पष्ट झालं नाही. याठिकाणी भाजपकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री मंगलप्रभात लोढा आणि शिंदे गटाचे यशवंत जाधव निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र आता अचानक मिलिंद नार्वेकर यांचं नाव समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे . उद्धव ठाकरेंच्या जवळची जी काही माणसे आहेत त्यात मिलिंद नार्वेकर आणि संजय राऊत ही दोन नावे आघाडीवर आहेत. या दोघांना कंटाळूनच आम्ही ठाकरेंना सोडलं असं अप्रत्यक्षरीत्या शिंदे गटाच्या आमदारांनी बंडावेळी म्हंटल होत. मात्र आता त्याच मिलिंद नार्वेकरांना एकनाथ शिंदेनी थेट लोकसभेची ऑफर दिली आहे.

कोण आहेत मिलिंद नार्वेकर- Milind Narvekar

मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar)हे बाळासाहेब ठाकरेंपासून उद्धव ठाकरेंपर्यंत शिवसेनेसाठी काम करत आहेत. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यकही होते. त्यांना शिवसेनेचं राजकारण आणि मातोश्रीबद्दल अनेक गोष्टी माहित आहेत. शिवसेनेची सूत्रे उद्धव ठाकरेंकडे आल्यापासून मिलिंद नार्वेकर आणि उद्धव ठाकरे अशी जोडी जमली. उद्धव ठाकरेंच्या सावलीप्रमाणेच नार्वेकरांचं जीवन आहे. मातोश्रीवर थेट ऍक्सेस कोणाला असेल तर तो सर्वात आधी मिलिंद नार्वेकरांना आहे इतके ते उद्धव ठाकरेंचे जवळचे मानले जातात. जैवेळी एकनाथ शिंदे यांच्यासहित ४० आमदारांनी बंड केलं त्यावेळी मिलिंद नार्वेकरानी सुरतला जाऊन आमदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यात यश आलं नाही. मात्र त्यानंतरही त्यांनी ठाकरेंची साथ कायम ठेवली. मात्र आता सध्याच्या राजकीय परिस्थितीत जर मिलिंद नार्वेकरांनी सुद्धा उद्धव ठाकरेंची साथ सोडली तर उद्धव ठाकरेंना बसलेला तो आत्तापर्यंतचा सर्वात मोठा धक्का असेल.