Milk ATM Machine | पुण्यात तरुणांनी तयार केली चक्क दुधाची एटीएम मशीन, व्हिडीओ होतोय जोरदार व्हायरल

Milk ATM Machine
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Milk ATM Machine | ATM हा शब्द ऐकला की, आपल्या डोळ्यासमोर पैशाची एक मशीन येते. त्यावर तुम्ही तुमचा पिन टाकून पैसे काढू शकता. पण आता असे एक नवीन एटीएम मशीन आले आहे, ज्यातून तुम्हाला दूध मिळणार आहे. सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दुधाची एटीएम मशीन दाखवलेली आहे. व्हिडिओ पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. हा व्हिडिओ पुण्यातील कात्रज आंबेगावातील प्रोस्टीन पॅसिफिक सोसायटीमधील आहे. दुधाच्या या एटीएम मशीनची सगळीकडे सध्या चर्चा आहे. या एटीएम (Milk ATM Machine) मशीनमधून दूध खरेदी करण्यासाठी लोक त्या ठिकाणी गर्दी करताना दिसत आहेत.

व्हिडिओ व्हायरल | Milk ATM Machine

एटीएम मशीनची ही कल्पना पुण्यामध्ये साकारलेली आहे. त्यांनी दुधाचे एटीएम मशीन उभारले आहे. अनेक नागरिक या मशीनचा लाभ घेऊन दूध खरेदी करतात. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाला लोकांचा खूप चांगला प्रतिसाद दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रॉयल तीन असे या दिवसाचे एटीएम मशीनचे नाव आहे. तीन मित्रांनी एक नवीन संकल्पना काढून हा नवीन व्यवसाय सुरू केलेला आहे. ज्या व्यवसायाला सध्या चांगला प्रतिसाद मिळत आहे.

https://www.instagram.com/reel/C6p2kZxtJbq/?utm_source=ig_embed&ig_rid=a18d63f1-4995-4475-a215-ba9f0c333d6e

सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान वायरल होताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करून व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये दिली आहे की, “पुण्यात चक्क दुधाची एटीएम पहिल्यांदाच पुणे कात्रज” या व्हिडिओवर अनेक लोकांनी प्रतिक्रिया दिली आहे. एका युजरने कमेंट करत दिली आहे की, “कल्पना चांगली असली तरी त्यामागे दुष्परिणाम देखील असतात. शिवाय मशीनची पाईप स्वच्छ आहे का आतून हे बघायला पाहिजे.”अनेकांना हा उपक्रम खूप आवडला आहे. तर अनेक लोक मात्र दुधाच्या एटीएम मशीनमधील हायजिनबद्दल प्रश्न उपस्थित करत आहेत.