दुध उत्पादकांना प्रतिलिटर मिळणार 5 रुपयांच अनुदान; विखे-पाटलांची मोठी घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| बुधवारी पशुसंवर्धन दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी राज्यामध्ये सहकारी संघांना दूध घालणाऱ्या उत्पादकांना गायीच्या दुधास प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा केली आहे. हे अनुदान शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. त्यासाठी फेंट, एसएनफची मर्यादा ठरविण्यात आली असल्याची माहिती राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली आहे.

यापूर्वी राज्य सरकारने गायीच्या दुधाला प्रतिलिटर ३४ रुपये दर देण्यात यावा, असे आदेश दिले होते मात्र काही दूध संघाने दर २७ ते २८ रुपयांपर्यंत खाली आणले. यानंतर भाजपचे ज्येष्ठ सदस्य हरिभाऊ बागडे, राष्ट्रवादी कनिसचे जयंत पाटील आणि अन्य सदस्यांनी आक्रमकाची भूमिका घेत राज्य सरकारने प्रतिलिटर अनुदान जाहीर करावे अशी मागणी केली होती. यावर उत्तर देत, “दूध संघांनी ३४ रुपये दर देणे बंधनकारक आहे. त्याशिवाय अनुदानासंदर्भात अधिवेशन संपण्यापूर्वी निर्णय घेतला जाईल” असे विखे पाटील यांनी म्हटले होते.

यानंतर बुधवारी विखे पाटील यांच्याकडून विधानसभेत निवेदन करण्यात आले. यावेळी बोलताना, “आवश्यकतेनुसार आढावा घेऊन मुदतवाढ देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, या संदर्भातील शासन निर्णय लवकरच निर्गमित करण्यात येईल” असे ते म्हणाले. मुख्य म्हणजे, दुग्ध विभागाकडून सादर झालेल्या निवेदनात म्हटले की, सहकारी दूध संघाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना ३.२ फॅट व ८.३ एसएनएफ (SNF) करिता प्रति लिटर २९ रुपये दूध दर संबंधित दूध उत्पादक शेतकऱ्याच्या वैयक्तिक बँक खात्यावर रोख विरहित अदा करणे बंधनकारक राहील. त्यानंतरच शेतकऱ्यांना सरकारमार्फत रुपये पाच प्रति लिटर बँक खात्यावर वर्ग करण्यात येणार आहेत.