प्रकाश आंबेडकरांना MIM ची युतीसाठी ऑफर; महाविकास आघाडीचा खेळ बिघडणार??

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । असदुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वाखालील ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन पक्षाने (AIMIM) वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर याना युतीची ऑफर दिली आहे. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्यासाठी आमचे दरवाजे केव्हाही उघडे आहेत असं म्हणत औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी हि खुली ऑफर आंबेडकर याना दिली आहे. महत्वाचे म्हणजे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत AIMIM आणि वंचित बहुजन आघाडीने एकत्र निवडणूक लढवली होती. आता हे दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र एकत्र आल्यास राज्यातील महाविकास आघाडीलाचा त्यांचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना इम्तियाज जलील म्हणाले, प्रकाश आंबेडकरांनी एआयएमआयएमसोबत यावे आणि राज्यात नवे समीकरण निर्माण करावे, त्यांच्यासाठी आमचे दरवाजे कायमच खुले आहेत. यापूर्वी आमच्यात काहीतरी घडले असावे ज्यामुळे आमची युती तुटली…परंतु सध्याची राजकीय परिस्थिती पाहता शिवसेनेचे २ तुकडे होतील असं कोणाला वाटलं नसेल, शरद पवार आणि अजित पवार हे काका पुतणे विभक्त होतील असेही कोणाला वाटलं नव्हतं, त्यामुळे या नव्या राजकीय समीकरणात आमच्याकडे नवा पर्याय आहे, आपण एकत्र आलो तर अधिक जागा जिंकू. अजूनही तुम्ही विचार करा असं आवाहन जलील यांनी प्रकाश आबेडकर यांना केलं.

दरम्यान, महाविकास आघाडीसोबत चर्चा फिस्कटल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी आत्तापर्यंत लोकसभेसाठी आपले ८ उमेदवार जाहीर केले आहेत. प्रकाश आंबेडकर आता महायुती आणि महविकास आघाडी यांच्या विरोधात तिसऱ्या आघाडीची स्थापना करणार अशाही चर्चा सुरु आहेत. असं झाल्यास त्याचा सर्वाधिक फटका हा महाविकास आघाडीलाच बसेल असं बोललं जात आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वंचितने ७ % मते घेतली होती. त्यावेळी वंचित आणि AIMIM च्या उमेदवारांमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या १० पेक्षा जास्त जागा पडल्या होत्या. त्यामुळे यंदाही जर वंचित आणि AIMIM युती झाल्यास महाविकास आघाडीचा खेळ बिघडण्याची शक्यता आहे.