Mini Tractor Subsidy | अवघ्या 35 हजार रुपयांत आणा मिनी ट्रॅक्टर घरी, जाणून घ्या सरकारची नवी योजना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Mini Tractor Subsidy | आपल्या देशातील जवळपास 70 टक्के होऊन अधिक लोकसंख्या ही शेती या व्यवसायावर अवलंबून आहे. त्याचप्रमाणे आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही शेतीशी शेतीवर देखील जास्त अवलंबून आहे. त्यामुळे आपले राज्य सरकारने केंद्र सरकार देखील नवनवीन अशा योजना राबवत असतात. जेणेकरून शेतकऱ्यांना कमी किमतीमध्ये सगळ्या गोष्टी घेता येतील. त्याचप्रमाणे त्यांना अनुदान देखील मिळेल.

आजकाल शेतकऱ्यांसाठी शेती करणे खूप अवघड झालेले आहे. त्यामुळे सरकार नेहमीच त्यांना हातभार लावण्याचा प्रयत्न करतात. यांत्रिकीकरण वाढल्यामुळे शेतातील बरीचशी कामही यंत्रामुळे केली जातात. अशातच आता सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी एक नवीन योजना सुरू केलेली आहे. या अंतर्गत आता शेतकऱ्यांना शेती उपकरणे घेणे सोपे झालेले आहे. या योजनेअंतर्गत तुम्ही केवळ 35 हजारांमध्ये मिनि ट्रॅक्टर (Mini Tractor Subsidy) किंवा इतर कृषी उपकरणे खरेदी करू शकता. आता ही योजना नक्की काय आहे? यासाठी कोण अर्ज करू शकतो? याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.

मिनी ट्रॅक्टरवर मिळणार सबसिडी

सरकारने ही योजना अल्पशेती असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी राबवलेली आहे. या सहाय्यक कृषी उपकरणांवर तुम्हाला सरकारकडून जवळपास 90 टक्के अनुदान (Mini Tractor Subsidy) मिळणार आहे. ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी तुम्हाला केवळ 35 हजार रुपये खर्च करावे लागणार आहेत. तसेच उर्वरित जी रक्कम आहे ती महाराष्ट्र सरकारकडून देण्यात येणार आहे. देशातील शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थिती सुधारण्यात यावी. त्याचप्रमाणे त्यांना शेतीची सगळी कामे यंत्राद्वारे करता यावी. यासाठी सरकारनेही नवीन योजना आणली आहे.

या उपकरणांवर मिळणार सबसिडी | Mini Tractor Subsidy

महाराष्ट्र सरकारच्या समाज कल्याण विभागाकडून ही योजना राबवण्यात आलेली आहे. या मिनी ट्रॅक्टर योजनेअंतर्गत आपल्या राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौध्द गटातील शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदानावर हे मिनी ट्रॅक्टर आणि कृषी उपकरणे दिली जाणार आहेत. महाराष्ट्र सरकारकडून 3 लाख 15हजार रुपयांच्या आर्थिक मदत तुम्हाला यासाठी दिली जाणार आहे. शेतकऱ्यांना केवळ 10 टक्के रक्कम भरावी लागणार आहे. जी फक्त 35000 असणार आहे यावर शेतकऱ्यांना कल्टीवेटर, रोटावेटर, ट्रेलर आणि मिनी ट्रॅक्टर यांसारख्या वस्तू खरेदी करता येणार आहेत.

मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • मतदान कार्ड
  • मोबाईल नंबर
  • बँक पासबुकची प्रत
  • जात प्रमाणपत्र
  • पत्त्याचा पुरावा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा