कृषी बाजार समितीचे नियम शेतकऱ्यांसाठी सुधारणार; मंत्री रावल काय म्हणाले बघाच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथे एक व्यापारी शेतकऱ्यांचे कांद्याचे पैसे देत नाही, याबाबत सदस्य रमेश बोरनारे यांनी सर्वांचे लक्ष वेधणारी सूचना उपस्थित केली. यावर प्रतिक्रिया देताना पणन मंत्री जयकुमार रावल (Jayakumar Rawal) यांनी विधानसभेत सांगितले की, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियमांमध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी सुधारणा केली जाईल. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीवर असलेल्या विश्वासावर शेतकरी आपला शेतमाल परवानाधारक व्यापाऱ्यांना विकतात. शेतकऱ्यांच्या हितासाठी बाजार समितीचे नियम अन धोरणे काळानुरूप सुधारण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले.

शेतकऱ्यांनी विकलेल्या मालाचा मोबदला –

कृषी उत्पन्न बाजार समितीने परवाना दिलेल्या व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी केला जातो. शेतकऱ्यांनी विकलेल्या मालाचा मोबदला कायद्यानुसार त्वरित, म्हणजेच त्या दिवशी किंवा किमान सात दिवसांच्या आत देणे आवश्यक आहे. वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या पैसे मिळवून देण्यासाठी संबंधित व्यापाऱ्याच्या मालमत्तेची आणि बँक हमीची जप्ती केली असून, या मालमत्तेच्या लिलावातून 31 लाख रुपये एकत्र करून 118 शेतकऱ्यांना त्यांचे पैसे दिले आहेत.

पणन मंत्री रावल यांनी काय सांगितले –

कलम 57 अंतर्गत संबंधित व्यापाऱ्याच्या वैयक्तिक मालमत्तांची यादी तयार करून जमीन महसूल थकबाकी कायद्यानुसार लिलावाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेला गती देऊन शेतकऱ्यांना त्यांच्या पूर्ण पैसे मिळवून दिले जातील, असे पणन मंत्री रावल यांनी सांगितले. या प्रकरणाशी संबंधित सर्व शेतकऱ्यांच्या हक्कांची सुरक्षा करण्यात येईल, आणि त्यासाठी एक बैठकही घेतली जाईल, असे ते म्हणाले.