रोहियो मंत्री संदीपान भुमरे यांच्या विरुद्ध ३० कोटींचा भूखंड हडपल्याचा आरोप; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : पैठण तालुक्यातील महाराष्ट्र शासनाची जमीन सिटी सर्वे नंबर 10/26 हि जमीन रोहियो मंत्री संदीपान भुमरे यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप पैठणचे माजी नगराध्यक्ष दत्त गोर्डे यांनी केला आहे. या विषयी त्यांनी औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.

पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले कि, रोहियो मंत्री भुमरे यांनी 30 कोटीच्या जमिनीचा भ्रष्टाचार केला आहे. त्यांनी त्या जमिनीचा बेकायदेशीररित्या इतर अधिकार धारक कडून नोटरी आधारे त्यांचा मुलगा विलास भुमरे 99 वर्षाचा करार नामा करून घेतला. त्यांनतर मंत्री पदाचा गैर वापर करत ती जमीन घरकुल योजनेत आणून त्यांच्या नातेवाईकांचे नवे त्या घरकुल यादीत टाकले आणि हि सर्व करत असताना त्यांना फक्त ती जमीन हडप करायची होती. सध्या ही त्या जमिनीवर मंत्री भुमरे आणि माजी नगराध्यक्ष सोमनाथ परदेशी यांचाही या जमीन घोटाळ्यात हस्तक्षेप आहे. असा आरोप माजी नगराध्यक्ष दत्त गोर्डे यांनी केला.

दरम्यान, गोर्डे यांनी जिल्हाधिकारी यांना गेल्या महिनाभरापूर्वी या प्रकरणाची तक्रार केली होती. त्यावर अद्यापही काही कारवाई झाली नाही असे गोर्डे म्हणले. त्यांनी काल पोलीस अधीक्षक लाच लुचपत विभाग औरंगाबाद, यांना कलम 13 नुसार मंत्री संदीपान भुमरे यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ही मेलद्वारे कळविले आहे. असे गोर्डे सांगतात.

Leave a Comment