चंद्रकांत खैरेंचं डोकं गोमुत्राने साफ करायला हवं; संदीपान भुमरेंची जळजळीत टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या औरंगाबादेतील पैठण मतदारसंघातील सभेनंतर शिवसैनिकांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा ज्या रस्त्यावरून गेला, त्या रस्त्यावर गोमूत्र शिंपडून रस्त्याचे शुद्धीकरण केले आणि आपला निषेध व्यक्त केला. त्यानंतर शिंदे गटातील आंध्र आणि राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांनी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर निशाणा साधला आहे. चंद्रकांत खैरे यांचं डोकं गोमुत्राने धुवायला पाहिजे अशा शब्दात त्यांनी खैरेंवर घणाघात केला.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना संदीपान भुमरे म्हणाले, गोमुत्राने रस्ता साफ करण्यापेक्षा खैरे याचे डोके गोमुत्राने साफ करायला हवं. आता त्यांना ती गरज आहे कारण त्यांचं डोकं आता काम करत नाही असा टोला भुमरे यांनी लगावला. आम्हीच आता चंद्रकांत खैरे यांचे डोके गोमुत्राने धुवू कॅंटीन त्याशिवाय त्यांचे डोकं काम करणार नाही असा इशाराही संदीपान भुमरे यांनी दिला.

दरम्यान, जावयाला दिलेल्या टेंडर बाबत विचारलं असता, याबाबत माझा काही संबंध नाही, मी कधी असले धंदे केले नाहीत. टेंडर ऑनलाईन पद्धतीने असत ते कोणीही भरू शकत. याबाबत मला कोणताही अधिकार नाही. विरोधकांनी फक्त आरोप करण्यापेक्षा एखादे बिल दाखवून द्यावे असं प्रत्युत्तर संदीपान भुमरे यांनी विरोधकांना दिले. उचलली जीभ लावली टाळूला असा हा प्रकार आहे असेही ते म्हणाले.