विशेष प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
एक मिनिट शंभूराजे बोलत असताना मधी बोलायच नसतं. आपण एकत्र काम केले आहे. कोरडा दुष्काळ नव्हे, ओला दुष्काळ पडला आहे. कशाचं सागता पाऊस चांगला झाला. दुष्काळच आहे ना… ओला दुष्काळ आहे ना, असे म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सभागृहात चांगलेच झापले.
मुंबईत सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे, यावेळी अजित पवार आणि शंभूराज देसाई यांच्यात हा खटका उडाल्याचे दिसून आले. अजित पवार म्हणाले, 2003 च्या दुष्काळामध्ये आपल्याकडे पाऊस पडत नव्हता. तेव्हा सगळ्यांनी सांगितले, तुम्ही कृत्रिम पाऊस पाडला तरी त्याचा फायदा होणार नाही. जगात अनेक काही भागात कृत्रिम पाऊस पाडला जातो, आम्ही ठरवलं तेव्हा जर कृत्रिम पाऊस पाडून शेतकऱ्यांचे संकट दूर होत असेल तर शेतकऱ्यांना दिलासा मिळत असेल तर ते धाडस आपण करू. त्यावेळी आम्ही 16 कोटी रूपये खर्च केले आणि कृत्रिम पाऊस पाडायचा प्रयत्न केला. काही भागात हा पाऊस पडला. या गोष्टीची अजित पवार माहिती देत असताना उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई मध्ये बोलायला गेले अन् झापाझापीचा प्रकार घडला.
https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/1110163569707806
पाटणला काहीजण पवनचक्की तोडायला, फोडायला निघाले होते ः- यावेळी अजित पवार पुढे म्हणाले, शंभूराजे मध्ये बोलायच नसतं, पाऊस चांगला झाला, कोरडा नाही, ओला दुष्काळ झाला आहे. कशाचं सांगता पाऊस चांगला झाला. मी उदाहरण देत होतो, तुमच्याच मतदार संघात विंड उभ्या केल्या. त्यावेळेस काहींनी काढलं यांची ब्लेड मोठी आहे. पाती मोठी आहे, त्यामुळे ढग आडली. काहीजण पवनचक्की तोडायला, फोडायला निघाली होती की नाही. लोकांच्या मनात अशा शंका येत असतात, परंतु लोकांना समजावून घ्यायचे असते. कोरड्या दुष्काळात कृत्रिम पाऊस पाडून शेतकऱ्यांना आधार देण्याचा प्रयत्न झाला. तेव्हा आताच्या काळात शेतऱ्यांवर जो काही प्रसंग येतोय आणि शेतकरी आत्महत्या करतोय. अशावेळी मुख्यमंत्री महोदय तुमचे लोक सत्कार करतायत, एवढे मोठे हार घालून घेत आहेत. फोटोसेशन होत आहे. अजूनही पाऊस सुरू आहे. दररोज 3 शेतकरी आत्महत्या करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यापासून 45 दिवसात 137 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.