मला अभिमान वाटतो…, मितालीची आपल्या सासूच्या दुसऱ्या लग्नाविषयी खास पोस्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  मराठी अभिनेत्री मिताली मयेकर (Mitali Mayekar) आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) यांची जोडी सोशल मीडियावर कायमच ॲक्टिव असते. हे दोघे सतत आपले गमतीशीर कधी रोमँटिक तर कधी एकमेकांचे टिंगल उडवतानाचे व्हिडिओ शेअर करत असतात. मात्र सध्या या दोघांनी केलेली एक पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड चर्चेचा भाग बनली आहे. नुकतीच मितली मयेकरने आपल्या कुटुंबात आलेल्या एका नवीन व्यक्तीची ओळख करून दिली आहे. ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून, तिचे सासरे आहेत. होय, मितालीने आपल्या सासूच्या म्हणजेच सीमा चांदेकर यांच्या दुसऱ्या लग्नाची पोस्ट शेअर केली आहे.

सिद्धार्थने आपल्या आईचे आणि मितालीने आपल्या सासूचे दुसरे लग्न मोठ्या धुमधडाक्यात लावून दिले आहे. आपल्या सासूच्या लग्नाचे फोटो आज मितालीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंना तिने खूप सुंदर असे कॅप्शन दिले आहे. या दोघांनी घेतलेल्या या निर्णयामुळे आज त्यांचे विशेष कौतुक करण्यात येत आहे. मितालीने केलेल्या या पोस्टवर अनेक मराठी कलाकारांनी सीमा चांदेकर यांना नवीन प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, सिद्धार्थ आणि मितालीचे खास कौतुक केले आहे.

Happy married life सासूबाई…

मिताली मयेकरने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “माझ्या सासूचं लग्न! किती सूना हे म्हणू शकतात की मी माझ्या सासूच्या लग्नात हजर होते? खरंच मला अभिमान वाटते तुझा की हा एव्हढा मोठ्ठा निर्णय तू अगदी न डगमगता घेतलास. मला अभिमान वाटतो तुझ्या मुलाचा की तो सुद्धा खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभा राहिला. आणि मला अभिमान वाटतो या एका अतिशय कमाल कुटुंबाचा एक भाग असण्याचा. आजवर तू आमच्या सगळ्यांसाठी सगळं अगदी मनापासून केलंस. पण आता स्वतःसाठी जगण्याची वेळ आलीये. अशीच कायम आनंदात राहा, हसत राहा. बाकी आम्ही मुलं तुझ्यासोबत आहोतच. असे म्हणत तिने या दोघांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. इतकेच नव्हे तर, मितालीने आपल्या सासूच्या लग्नातील खूप सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

https://www.instagram.com/p/CwReqB0qEbk/?igshid=MzRlODBiNWFlZA==

सगळ्यांसाठी पाय झिजवलेस….

मुख्य म्हणजे, आपल्या आईच्या दुसऱ्या लग्नासाठी सिद्धार्थ चांदेकरने देखील शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनीही एक पोस्ट शेअर करून, ‘Happy Second Innings आई! तुला पण एक जोडीदार हवा, तुझ्या मुलांव्यतिरिक्त एक आयुष्य हवं, तुझं एक स्वतंत्र सुंदर जग हवं, हे कधी लक्षातच नाही आलं गं माझ्या. किती ते एकटं एकटं रहायचं? तू आत्ता पर्यंत सगळ्यांचा विचार केलास, सगळ्यांसाठी पाय झिजवलेस. आता फक्त तुझा आणि तुझ्या नव्या जोडीदाराचा विचार कर. तुझी पोरं कायम तुझ्या पाठीशी आहेत. तू माझं लग्न थाटात लावलंस, आता मी तुझं लग्न लावतोय. माझ्या आयुष्यातलं अजून एक सुंदर लग्न. माझ्या आईचं! आय लव्ह यू आई…” असे म्हणले आहे.

https://www.instagram.com/p/CwRNgjzoR7R/?igshid=MzRlODBiNWFlZA==

दरम्यान, सोशल मीडियावर चर्चेत असणाऱ्या या जोडीने घेतलेल्या निर्णयाचे आज खास कौतुक केले जात आहेत. मिताली आणि सिद्धार्थ मराठी सिनेसृष्टीत एक क्युट कपल म्हणून ओळखले जाते. या दोघांनी देखील आपल्या कामातून प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. विशेष म्हणजे, आज त्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे प्रेक्षकांचे त्यांच्याविषयी आणखीन प्रेम वाढलेले दिसत आहे. अनेकांनी त्यांनी शेअर केलेल्या पोस्टवर भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.