Miyazaki Mango | ‘या’ आंब्याची जगभर चर्चा ! 1 किलो आंब्याची किंमत तब्बल 3.50 लाख रुपये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Miyazaki Mango | बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आंबे उपलब्ध असतात. सध्या अनेक आंब्याच्या जाती आहेत. परंतु एका आंब्याच्या जातीची जरा जास्त चर्चा चालू आहे. सध्या उत्तर प्रदेशातील एका शेतकरी संदीप चौधरी यांनी त्यांच्या शेतात आंब्याची दोन झाडे लावलेली आहेत. आणि त्या दोन झाडांची सर्वत्र चर्चा होत आहे त्यांनी आंब्याची झाडे लावलेली आहेत. त्यांनी मीयाझाकी (Miyazaki Mango) या वाणाची आंब्याची झाडे लावलेली आहेत. यातील आंब्याची किंमत हे 2.70 लाख रुपयांपासून 3.50 लाख रुपये प्रति किलो एवढी आहे. आंब्याचे हे वाण जपानच्या विद्यापीठात तयार केलेले आहे.

संदीप चौधरी यांनी त्यांच्या या आंब्याच्या झाडांबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. त्यांनी सांगितल्यानुसार या दोन्ही झाडांवर फक्त तीन आंबे लागलेले आहेत. या एका आंब्याची किंमत लाखो रुपये आहे. हे आंबे विकायला काढल्यास ते एका झटक्यातच लखपती होऊ शकतात. परंतु संदीप चौधरी यांना देशाचे राष्ट्रपती पंतप्रधान आणि उत्तर प्रदेशचे मुख्य मुख्यमंत्री यांना हे तीन आंबे द्यायचे आहे. हा आंबा खायला अत्यंत गोड असतो. आंब्यामध्ये अँटिऑक्सिडंट , व्हिटा केरोटीन आणि फॉलिक ऍसिड यांसारखे घटक असतात. त्याचप्रमाणे कर्करोगाशी सामना करण्यासाठी हा आंबा अत्यंत फायदेशीर आहे.

7500 रुपयांना खरेदी केले झाड | Miyazaki Mango

संदीप चौधरी यांनी 9 महिन्यांपूर्वी या आंब्याची दोन झाडे कोलकत्यावरून आणली होती. त्यांना एका झाडासाठी 7500 मोजावे लागले होते. जैविक पद्धतीने त्यांनी या झाडांची लागवड केलेली आहे. या एका झाडाची उंची ही फक्त 3 फूट एवढी आहे. त्याचप्रमाणे एका झाडाच्या आंब्याचे वजन 300 ते 350 ग्रॅम एवढे आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, हे आंबे विकत घेण्यासाठी त्यांना अनेक ठिकाणाहून कॉल देखील येत आहे. सुरतचे व्यावसायिक प्रवीण गुप्ता यांचा देखील त्यांना फोन आला होता. मात्र त्यांना हे आंबे विकायचे नाहीत. आंब्याची चोरी होऊ नये, म्हणून त्यांनी शेतात सीसीटीव्ही कॅमेरा देखील लावलेला आहे. हा कॅमेरा 360 डिग्रीमध्ये फिरतो. त्यामुळे बागेत जर कोणी जाण्याचा प्रयत्न केला, तर त्याचे नोटिफिकेशन संदीप यांना त्यांच्या मोबाईलवर समजते.