अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघात आमदार बाबासाहेब पाटील इतिहास रचतील?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अपक्षांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघात 2019 ला मात्र राष्ट्रवादीच्या तिकिटावर बाबासाहेब पाटील यांनी गुलाल उधळला… चार वेळा काँग्रेसने तर तब्बल आठ वेळा विरोधी पक्षाचा आमदार निवडून देणाऱ्या अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघाने 2014 च्या मोदी लाटेतही अपक्षाच्या बाजूने कौल दिला… वंजारी आणि धनगर समाज जायंट किलर ठरणाऱ्या या मतदारसंघात आमदार मात्र नेहमीच मराठा चेहरा राहिला… स्टँडिंग आमदार बाबासाहेब पाटील हे राष्ट्रवादीच्या फुटीत अजित दादांसोबत गेलेत… तर त्यांचे कडवे विरोधक माजी आमदार विनायक पाटील यांनी अलीकडेच राष्ट्रवादीची तुतारी हाती घेतलीये…. एकूणच हे तरी स्पष्ट दिसतय की येणाऱ्या विधानसभेला अहमदपूर चाकूरमध्ये दोन पाटलांच्यात घड्याळ वर्सेस तुतारी? असा राजकीय संघर्ष पाहायला मिळू शकतो… येणाऱ्या विधानसभेला या दोन्ही पाटलांपैकी नेमक्या कुठल्या राष्ट्रवादीच्या पाटलांना जनता आमदार बनवतेय? बाबासाहेब पाटील आपली विजयाची परंपरा कायम राखतील, की मतदारसंघात तुतारी वाजेल? अहमदपूर चाकूर या मतदारसंघाचं साधं सोप, पॉलिटिकल डिकोडिंग पाहूयात,

व्यापार, उद्योग, कारखानदारी, रोजगाराचा कसलाही गंध नसणारा… उजाड शेत, माळरान आणि सामाजिक हेळसांड या मतदारसंघाच्या नेहमीच पाचवीला पुजलेली… घोषणांचा पाऊस पाडायचा, आणि निवडणुका जिंकायच्या… असा इथला एकूणच प्रकार… राजकारणात विकास करण्यासाठी जी स्थिरता लागते ती अहमदपूर चाकूरला कधी मिळालीच नाही… कधी जातीच्या…कधी अस्मितेच्या… तर कधी भावनेच्या… आहारी जाऊन अहमदपूरकरांनी राजकीय कौल दिला…त्यामुळेच अगदी ठामपणे या मतदारसंघासाठी झगडणारा राजकीय पुढारी सांगायचा म्हटला, तर अगदी उरतो फक्त शून्य… याच राजकीय निष्क्रियतेतून मतदारसंघाने अनेक आमदार बदलले… 2009 साली महाराष्ट्रात रिपब्लिकन डावी लोकशाही संघटना म्हणजेच अनेक डाव्या विचारांच्या छोट्या मोठ्या पक्षांनी एकत्रित येत निवडणूक लढवली तेव्हा ही जागा रासपला सुटली… रासपकडून बाबासाहेब पाटील तर काँग्रेसकडून विनायक पाटील असा अटीतटीचा सामना यावेळेस झाला… आणि काँग्रेस सारख्या इस्टॅब्लिश पक्षाला डावलून रासपच्या तिकिटावर बाबासाहेब पाटलांनी आमदारकीचा भंडारा उधळला…

YouTube video player

पुढे 2014 च्या निवडणुकीच्या आधीच मतदारसंघातील राजकीय समीकरणं बदलली… बाबासाहेब पाटलांनी निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला… मात्र यावेळेस झालेल्या चौरंगी लढतीत अपक्ष म्हणून विनायकराव पाटील विजयी झाले… 2019 पूर्वीचं राजकारणाचे गणित पाहून त्यांनी भाजपात प्रवेश केला खरा… पण अहमदपूर चाकुरने 2019 ला पुन्हा वातावरणाच्या विरोधात कौल देत राष्ट्रवादीच्या बाबासाहेब पाटलांना निवडून आणलं… खरतर 2019 लाही विनायकराव पाटीलच मैदान मारतील, असं क्लियर चित्र होतं…पण भाजपतील अंतर्गत नेत्यांनीच विनायकरावांना राजकारणातून डावल्यामुळे आणि भाजपातील दिलीपराव देशमुख, अयोध्या केंद्रे या दोन बंडखोरांनी बंडाळी केल्यामुळे मतदान फिरलं…आणि याचा फायदा बाबासाहेब पाटलांनी उचलत ते आमदार झाले…

यात काही निष्कर्ष निघाले… पहिलं असं की विनायकराव पाटलांना पक्षाच्या चिन्हावर निवडणूक जिंकता येत नाही… अहमदपूर चाकूरमध्ये एखाद्या आमदाराला लागून दुसरी निवडणूक जिंकता येत नाही… मतदार संघातील जनता नेहमी कौल सत्तेच्या विरोधात देते… सध्याचा राजकारण कसं आहे? हे पाहिल्यावर लक्षात येतं की राष्ट्रवादीतील फुटीनंतर बाबासाहेब पाटील अजित दादांसोबत गेलेत… त्यात बाबासाहेब महायुतीत आल्यामुळे पक्षातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून आणि विधानसभेच्या उमेदवारीचा अंदाज घेऊन विनायकराव पाटलांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाची तुतारी हाती धरलीय… सध्या मतदारसंघात हे दोनच तगडे उमेदवार असल्याने पहिल्यांदाच अहमदपूरची निवडणूक घड्याळ विरुद्ध तुतारी अशा लाईनने पुढे जाणार आहे… मतदार संघाची रचना विनायकराव पाटलांची कार्यकर्त्याची फळी आणि शरद पवार यांची मदत या त्रीसूत्रीचा फायदा येणाऱ्या विधानसभेला विनायकराव पाटलांना होऊ शकतो…

कारखानदारी, शिक्षण संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवर एकहाती असणारा होल्ड ही बाबासाहेब पाटलांची स्ट्रेंथ आहे… त्यासोबतच सत्ताधारी गटात असल्यामुळे विकासकामांचा आणलेला भरभक्कम निधीही त्यांच्यासाठी प्लस मध्ये जाणारा आहे… बाकी अजित दादांच्या राष्ट्रवादीसोबत गेल्यामुळे मतदारसंघातील कार्यकर्ते आणि जनता काही प्रमाणात नाराज आहेच… या गोष्टी अर्थात विद्यमान आमदारांच्या अंगलट येऊ शकतात… तब्बल तीन टर्म मतदार संघाचे प्रतिनिधित्व करूनही डोंगरी तालुक्यांतील पिण्याच्या पाण्याचा…स्थलांतराच्या प्रश्नाचा… आमदार साहेबांना तोडगा काढता आलेला नाहीये… मतदार संघाच्या विकासाचं लोकप्रतिनिधीकडे शाश्वत मॉडेल नसणं… हीच अहमदपूर चाकूर मतदारसंघासाची मोठी शोकांतिका म्हणावी लागेल… नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी बाबासाहेबांना अवघं तीन हजारांचं निसटत लीड देण्यात यश मिळालय… हा आकडा दाखवून देतोय की राष्ट्रवादीच्या बाबासाहेब पाटलांची आमदारकी धोक्यात आहे… बाकी दलित, मुस्लिम, वंजारी आणि धनगर मतदार कुणाच्या बाजूने राहणार? यावरही अहमदपूर चाकूरचा निकाल अवलंबून आहे हे नाकारता येत नाही…